नाशिक

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ

नाशिक : प्रतिनिधी
सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेने कर्जदारांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. बँकेने कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्के (अर्धा टक्का) कपात करण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय ऑगस्ट 2026 पासून लागू झाला आहे. या निर्णयाचा लाभ बँकेच्या सुमारे चार हजार नियमित कर्जदारांना मिळणार आहे.
जिल्हाभरातील पाच शाखांमधून कार्यरत असलेली नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम, विश्वासार्ह आणि सभासदाभिमुख संस्था म्हणून ओळखली जाते. सभासदांना अधिक दिलासा देण्याच्या उद्देशाने संचालक मंडळाने कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्के कपात करण्याचा निर्णय एकमताने मंजूर केला. हा निर्णय ऑगस्ट 2026 पासून अमलात आला असून, त्यामुळे सुमारे चार हजार नियमित कर्जदारांच्या कर्जाचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
सध्याच्या आर्थिक परिस्थितीत व्याजदरातील ही कपात कर्जदारांसाठी महत्त्वाची ठरणार असून, सभासदांना दिलासा देण्याच्या बँकेच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. बँकेच्या प्रगतीसोबतच सभासदांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी भविष्यातही सकारात्मक आणि ग्राहकाभिमुख निर्णय घेतले जातील, असा विश्वास अध्यक्ष नीलेश यादवराव देशमुख, उपाध्यक्ष विनोद विजय जवागे, संचालक मंडळ तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केला.

सहकाराचा मूलमंत्र म्हणजे सभासदांचे हित. बँकेची आर्थिक स्थिती सक्षम असल्यामुळे कर्जदारांना व्याजदर कपातीचा लाभ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतला आहे. भविष्यातही सभासदांना अधिकाधिक सवलती आणि दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– नीलेश देशमुख, अध्यक्ष

कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे हजारो सभासदांच्या आर्थिक भारात लक्षणीय घट होईल. सभासदांचा विश्वास हेच बँकेचे सर्वांत मोठे बळ असून, त्यांच्या हितासाठी अशा लोकाभिमुख योजना सातत्याने राबविण्यात येतील.
– विनोद जवागे, उपाध्यक्ष

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

15 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

15 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

15 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

15 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

15 hours ago

नाशिकच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला

आ. हिरे, खा. वाजे यांची रेल्वेमंत्र्यांसमवेत बैठक नाशिक : प्रतिनिधी नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सरळ मार्गी करण्याच्या…

16 hours ago