नाशिक

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ. झाकीर हुसेन व इतर रुग्णालयांत रुग्णांना कुठल्याही प्रकारे चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. डॉक्टर वेळेवर थांबत नाहीत. मनुष्यबळाअभावी रुग्णांना माघारी फिरावे लागते. ज्या तपासण्या केल्या जातात, त्यांचे अहवाल पाच ते सहा दिवसांनी दिले जातात, असा आरोप स्थायी सदस्यांनी करत आरोग्य विभागाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले. दरम्यान, याप्रकरणी शनिवारी (दि.8) विशेष महासभेनंतर स्वतंत्र बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिले.
नाशिक महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली (दि. 6) पार पडली. यावेळी आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, स्मिता झगडे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक योगेश गाडेकर यांनी नाशिकरोड बिटको रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. महापालिका डॉक्टरांना लाखोंचे मानधन देते, मात्र हे डॉक्टर वेळेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला. रुग्णालयात डॉक्टरांची मनमानी सुरू आहे. याचा जनसामान्यांना त्रास होतो आहे. बिटकोसह झाकीर हुसेन रुग्णालयात कोट्यवधींचा ऑक्सिजन प्लांट असूनही ते तसेच पडले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी आदिती पांडे, बाळा निगळ, दीपाली कुलकर्णी, जयश्री गायकवाड यांनीदेखील रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली.

तर प्रत्येक प्रभागात गोदापार्कसारखा प्रकल्प
खासगीकरणाद्वारे महापालिकेने गोदापार्क प्रकल्प चालवण्यास दिल्याने पालिकेला वर्षाला चाळीस लाखांचे उत्पन्न मिळत आहे. शिवाय, या प्रकल्पात स्वच्छतेसह इतर सर्व गोष्टींचा आनंद मिळत असल्याने नागरिकांचा मोठा प्रतिसाद या प्रकल्पास मिळत आहे. प्रत्येक प्रभागात आपण असा प्रकल्प साकारू शकतो, यासाठी एक एकर जागेची आवश्यकता लागेल, असेही आयुक्तांनी म्हटले.

आयुक्तांच्या अनुपस्थितीत सभा तहकूब
प्रारंभी स्थायी सभेत आयुक्त मनीषा खत्री उपस्थित नसल्याने यावरून सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोवर सभा होणार नसल्याचा पवित्रा घेतला. यानंतर सभा पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावी लागली. आयुक्त खत्री आल्यानंतर स्थायी सभा सुरू झाली.

सातपूरच्या लॅबला नोटीस
दरम्यान, सातपूर विभागातील मनपाच्या रुग्णालयात एका व्यक्तीचे नमुने घेतले असता सहा दिवस होऊनही अहवाल मिळाला नाही. सदर व्यक्ती त्याचा अहवाल घेण्यासाठी गेले असता त्यांचा अहवाल चुकल्याचे सांगत पुन्हा नमुने द्या, असे सांगितले. हा मुद्द सदस्यांनी उपस्थित करत आरोग्याच्या भोंगळ कारभारावर लक्ष वेधले. यावेळी सभापती मच्छिंद्र सानप यांनी संबंधितांना तत्काळ नोटीस देण्याचे
निर्देश आरोग्य विभागाला दिले.

फाळके स्मारक खासगीकरणामुळे तोटा कमी
फाळके स्मारक खासगीकरणावर देऊन त्यावर 19 कोटी रुपये खर्चून पालिकेला फटका बसत असल्याचा आरोप राहुल दिवे यांनी केला. यावेळी आयुक्त मनीषा खत्री यांनी पालिकेला फाळके स्मारक चालवणे आर्थिकद़ृष्ट्या परवडणारे नव्हते. पालिकेला तीन वर्षांत 25 कोटींचा फटका बसला. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर वेस्ट टू वंडर पार्क उभारले जात आहे. याद्वरे पर्यटनास चालना मिळून शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडणार असल्याचे आयुक्तांंनी म्हटले.

मोकळ्या भूखंडांची पालिकेलाच माहिती नाही : गाडेकर
ठाकरे सेनेचे योगेश गाडेकर यांनी शहरात महापालिकेचे मोकळ्या भूखंडांचा मुद्दा उपस्थित केला. शहरात अनेक भागांत मनपाचे मोकळे भूखंड असून, त्याची माहिती पालिकेलाच नसल्याचे त्यांनी म्हटले. सदर जागेवर अतिक्रमण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, आयुक्त मनीषा खत्री यांनी शहरातील सर्व मोकळ्या भूखंडांची माहिती घेऊन कुठेही अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेतली जाण्याचे आश्वासन दिले.

रस्ते दुरुस्तीसाठी फेरनिविदा
शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी ठेकेदार कामे करण्यासाठी तयार आहेत, मात्र अद्याप त्यांना काम करू दिले जात नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. ही कामे करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने फेरनिविदा काढावी लागणार असल्याचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी म्हटले.

Inspection of the medical facility by permanent members.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

15 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

15 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

15 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

15 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

15 hours ago

नाशिकच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला

आ. हिरे, खा. वाजे यांची रेल्वेमंत्र्यांसमवेत बैठक नाशिक : प्रतिनिधी नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सरळ मार्गी करण्याच्या…

16 hours ago