नाशिक

घरासह परिसरात पाणी साचू देऊ नका

डेंग्यू प्रतिबंधासाठी मनपाची जनजागृती

नाशिक : प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य (मलेरिया) विभागाने नागरिकांना आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे आवाहन केले आहे.
डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार एडीस एजिप्टाय या डासामार्फत होतो. हा डास घरातील तसेच परिसरातील सात दिवसांपेक्षा अधिक काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व परिसरात पाणी साचणार नाही याची नियमित काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. डेंग्यू प्रतिबंधासाठी महत्त्वाच्या सूचना आठवड्यातून एकदा घरातील सर्व पाण्याची भांडी, टाक्या व हौद स्वच्छ करून कोरडे करा.कुलर, फ्रिजचा ट्रे, फुलदाण्या आणि कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका.घराच्या परिसरातील जुने टायर, डबे, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकचे कप यांची विल्हेवाट लावा.पाण्याच्या टाक्या कायम झाकून ठेवा.बांधकामस्थळे, बेसमेंट व गच्चीवर पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.अंगभर कपडे परिधान करा आणि आवश्यक असल्यास डासप्रतिबंधक क्रीम किंवा जाळीचा वापर करा.ताप, अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे किंवा अंगावर पुरळ आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.स्वतःहून औषधोपचार करू नका; विशेषतः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेणे टाळा.डासांची उत्पत्ती आढळल्यास किंवा धूर फवारणीची आवश्यकता असल्यास मनपाशी संपर्क साधा.नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध भागांमध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी, धूर फवारणी तसेच गप्पी मासे उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू असून, यासाठी विभागनिहाय नियुक्त कर्मचार्‍यांशी नागरिकांनी संपर्क साधावा.

डेंग्यू व मलेरियाच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिकेकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात आणि परिसरात स्वच्छता राखून पाणी साचू न देणे हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातूनच डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल.
– मनीषा खत्री, आयुक्त, मनपा

 

 

Do not allow water to stagnate in and around the house.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago