नाशिक

जळकू परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

शेतकर्‍यांना दिलासा; मात्र तालुक्यात दुबार पेरणीचे संकट कायम

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे 3 ते 3.30 वाजेच्या दरम्यान ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल एक ते दीड तास सुरू असलेल्या या पावसामुळे परिसरातील शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या जळकू परिसरातील शेतकर्‍यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.
गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसानंतर तालुक्यात खरीप हंगामातील प्रलंबित पेरण्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यात आल्या. सध्या तालुक्यात सुमारे 50 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने शेतातील नव्याने उगवलेल्या पिकांवर संकट ओढवले आहे. मालेगाव तालुक्यात प्रामुख्याने मका व कापूस या पिकांची लागवड केली जाते. या पिकांच्या प्रारंभीच्या वाढीसाठी नियमित पावसाची नितांत आवश्यकता असते. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली असून, लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, जळकू परिसरात झालेल्या मुसळधारेमुळे तेथील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश गावांत अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकर्‍यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.

Cloudburst-like rainfall in the Jalku area.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago