नाशिक

विष विकत घेऊ नका, स्वतःचे आयुष्य खराब करू नका!

एफडीए आयुक्त मुंढे यांचे तरुणांना आवाहन; बंदी असूनही गुटखा मिळतो कसा?

मुंबई : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने राज्यात गुटखा आणि भेसळयुक्त अन्नाचा सुळसुळाट रोखण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कारवाईला व्यापक जनसमर्थन लाभत आहे. मुंढे यांनी नुकत्याच एका विशेष मुलाखतीत गुटखा माफियांची नवी कार्यपद्धती आणि राज्यातील दूध भेसळीच्या धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका, विष विकत घेऊ नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी तरुणाईला केले आहे. महाराष्ट्रात बंदी असूनही गुटखा मिळतोच कसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अशा माफिया आणि भेसळखोरांना मुंढेंनी कडक शब्दांत इशाराही दिला आहे.
या मुलाखतीत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा बंदीची अंमलबजावणी, गुटखा माफियांचे जाळे, दूध भेसळ आणि अन्न सुरक्षेसंदर्भातील कायद्याची माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर 2012 पासून बंदी आहे. मात्र, गुटखा माफियांनी आपली कार्यपद्धती बदलली असून, त्यांनी उत्पादन केंद्रे राज्याबाहेर हलवली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बंदी असली तरी शेजारच्या राज्यांतून गुटख्याची तस्करी केली जात आहे. गुटखा माफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका)अंतर्गत कारवाई सुरू झाल्यानंतर या टोळ्यांनी आपले जाळे राज्याबाहेर विस्तारले. त्यामुळे पुरवठ्याचे स्रोत बदलले असले, तरी बेकायदेशीर व्यापार सुरूच असल्याचे त्यांनी नमूद केले.
गुटखा विक्रीप्रकरणी लहान टपर्‍यांवर कारवाई होताना दिसते. मात्र, मोठ्या कंपन्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. यावर उत्तर देताना मुंढे म्हणाले की, संबंधित कंपन्या राज्याबाहेरून संपूर्ण साखळी चालवत आहेत. मात्र, आता अशा कंपन्यांच्या मालकांनाही थेट गुन्ह्यात आरोपी केले जात असून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवले जात आहेत.

मागणी थांबायला हवी
गुटख्याविरोधातील लढाई केवळ प्रशासनाने लढून उपयोग होणार नाही, असे सांगत मुंढे यांनी नागरिकांनाही आवाहन केले. लोकांनी स्वतःहून गुटखा खाणे बंद केले, तर मागणीच संपेल आणि मागणी नसल्यास पुरवठाही आपोआप थांबेल. गुटख्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याकडे तुकाराम मुंढे यांनी लक्ष वेधले.

 

Do not buy poison; do not ruin your life!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago