नाशिक

पिंपरखेडला बोगस डॉक्टरला अटक

नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त

पळाशी : वार्ताहर
अ‍ॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या पिंपरखेड (ता. नांदगाव) येथील बोगस डॉक्टरवर तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी कारवाई करत नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यास अटक केली असून, त्याच्याकडील उपलब्ध औषधसाठा जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे कुठलीही वैद्यकीय परवानगी व शिक्षण नसताना अभिजित जगदीश मुखर्जी या बोगस डॉक्टरने ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. रुग्णाच्या जीवाशी खेळत उपचार केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित मुखर्जी अ‍ॅलोपॅथिक औषधांद्वारे रुग्णांवर उपचार करीत असल्याची तक्रार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगताप यांच्याकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून डॉ. जगताप यांनी आरोग्य विस्तार अधिकारी अमोल कठाळे व डॉ. दत्तात्रय मोरे यांच्यासह मुखर्जी याच्या पिंपरखेड येथील दवाखान्यावर छापा टाकत कारवाई केली. या झडतीदरम्यान मुखर्जी याच्या दवाखान्यात अ‍ॅलोपॅथिक औषधे, शेड्युल एन वन अंतर्गत येणारी औषधे, बी.पी., मशीन, स्टेथोस्कोप, सलाइन स्टँड, डॉक्टर बॅग यांसह उपचार साहित्य आढळले. हा संपूर्ण साठा जप्त केला. संशयिताने यावेळी बीईएमएस, सीएमएस आणि ईडीपी, डीएनवायएस इलेक्ट्रोपॅथी अशा गैर अ‍ॅलोपॅथिक पदव्या सादर केल्या. याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमांंतर्गत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सुनील बढे तपास करीत आहेत.

Gavkari Admin

Recent Posts

चोरी झालेली बाइक सापडली

शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…

9 hours ago

सर्व्हर डाऊनमुळे इंधन पुरवठा ठप्प; वेबसाइट हॅकची चर्चा

वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…

10 hours ago

गोंदेजवळ आयशरची कारला धडक; 5 म्हशी ठार

सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्‍या आयशरने डाव्या…

10 hours ago

दिंडोरी, सुरगाण्यात अवकाळी पावसाचा कहर

वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…

10 hours ago

एरंडगाव शिवारात युवकाचा मृत्यू

येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव…

11 hours ago

चांदवडच्या दुर्गम भागात पाणी अन् वीज समस्या

खासदारांचा कठोर पवित्रा; मूलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रशासनास आदेश चांदवड ः वार्ताहर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील…

11 hours ago