राजाभाऊ आहिरेंनी स्ट्राँगरूमबाहेर गोधडीसह ठोकला मुक्काम
चांदवड : वार्ताहर
चांदवड नगरपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडले असले तरी, निकालाची तारीख लांबणीवर पडल्याने राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकीकडे मत निश्चितीसंदर्भातील व्हायरल ऑडिओ क्लिप आणि दुसरीकडे मतमोजणीचा लांबलेला मुहूर्त, यामुळे निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणात अपक्ष उमेदवार राजाभाऊ आहिरे यांनी थेट स्ट्राँगरूमबाहेरच मुक्काम ठोकला आहे. कडाक्याच्या थंडीत अंथरूण-गोधडी घेऊन ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी पहारा देणार्या राजाभाऊंची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.
तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आल्या असून, उमेदवारांना सीसीटीव्हीद्वारे निगराणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ही तांत्रिक सुविधा असतानाही उमेदवारांमधील अस्वस्थता कमी झालेली नाही.
भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असूनही तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले राजाभाऊ (राजेश) आहिरे यांनी या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली आहे. निकालातील विलंबामुळे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी राजाभाऊंनी थेट तहसील कार्यालयाच्या आवारात स्ट्राँगरूमसमोरच आपले बिर्हाड मांडले आहे. स्ट्राँगरूम परिसरात पोलीस आणि निवडणूक आयोगाचा कडक बंदोबस्त असला तरी, राजाभाऊंच्या या गांधीगिरी स्टाईल पहार्यामुळे प्रशासनावरही एक प्रकारे दबावाचे आणि पारदर्शकतेचे वातावरण तयार झाले आहे. आता 21 डिसेंबरला ईव्हीएममधून कोणाचे नशीब उघडणार आणि या राजकीय नाट्यावर काय पडदा पडणार, याकडे संपूर्ण चांदवडकरांचे लक्ष लागून आहे.
व्हायरल क्लिप आणि वाढता संशय
निवडणुकीच्या तोंडावर चांदवडमध्ये एका मत निश्चितीसंदर्भातील ऑडिओ क्लिपने खळबळ उडवून दिली होती. सोशल मीडियावर ही क्लिप प्रचंड व्हायरल झाली असून, यात काही व्यक्ती मतांच्या सौदेबाजीवर चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. आता मतमोजणी लांबणीवर पडल्याने या व्हायरल क्लिपचा आणि निकालाच्या विलंबाचा काही संबंध आहे का? अशी शंका सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर राजाभाऊंच्या प्रत्यक्ष उपस्थितीने समर्थकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…