नाशिक

पाणीपुरवठा योजनेचा ट्रान्स्फॉर्मर खोलून साहित्य लंपास

चोरट्यांचा अफलातून कारनामा, नांदूरशिंगोटेसह पाच गावांचा पाणीपुरवठा बंद

सिन्नर : प्रतिनिधी
कणकोरीसह पाच गावांना पाणीपुरवठा करणार्‍या भोजापूर धरणावरील मुख्य ट्रान्स्फॉर्मरची गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी साफ लूट केली. विद्युत पुरवठा बंद करून चोरट्यांनी ट्रान्स्फॉर्मर खाली उतरवला आणि त्यातील सर्व तांब्याच्या कॉइल्स, बुशिंग, ऑइल, कोर यांसह लाखोंचे साहित्य काढून पोबारा केला. सकाळी जागेवर फक्त रिकामा लोखंडी बॉक्स उभा असल्याचे पाहून पाणीपुरवठ्याचा विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांच्या पायाखालची जमीन सरकली.
भोजापूर धरणातून नांदूरशिंगोटे, कणकोरी व पाचगाव परिसराला पिण्याचे पाणी उचलले जाते. यासाठी खास ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आला होता. मात्र, गुरुवारी रात्रीच चोरट्यांनी या भागातील लाईन बंद करून शांतपणे ट्रान्स्फॉर्मर उचलला आणि आतलं सर्व किमती साहित्य लंपास केले. शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा योजनेतील कामगार कामावर आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ ग्रामपंचायतीला माहिती दिली. कळताच ग्रामविस्तार अधिकारी जीवन सावकार व कर्मचारी धरणावर पोहोचले. जागेची पाहणी करत पंचनामा करण्यात आला. पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ग्रामस्थांना कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन

ट्रान्स्फॉर्मरमधील साहित्य चोरी झाल्यामुळे पाणीपुरवठा काही दिवस अडचणीत राहणार आहे. नवा ट्रान्स्फॉर्मर बसवण्यासाठी साडेतीन लाखांचा खर्च येणार असून, तो ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा समितीला करावा लागेल. त्यामुळे ज्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकली आहे, त्यांनी तातडीने कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. – शोभा बर्के, सरपंच, नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago