उत्तर महाराष्ट्र

अवयवदानासाठी दात्यांची प्रतीक्षा!

 

ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाइकांना समुपदेशनाची गरज

नाशिक ः देवयानी सोनार
दानाचे महत्व सर्वज्ञात आहेच. रक्तदानासह अवयव दान सर्वश्रेष्ठ आहे. जिवंतपणी रक्तदान, किडनी,नेत्रदान करू शकतो.परंतु मेंदूमृत रुग्णांचे अवयव दुसर्‍या गरजवंताला देऊन एक नवीन जीवदान मिळू शकते. गेल्या काही वर्षांत अवयवदान करण्याचे प्रमाण वाढीला लागले असले तरी त्याची प्रभावी जनजागृती अजूनही झालेली नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत ही चळवळ थंडावली आहे. त्यामुळे अवयवदानासाठी दात्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

 

 

 

 

 

 

 

अवयव प्रत्यारोपण ही आधुनिक वैद्यकीय शास्त्राने प्राप्त केलेली सिध्दी आहे. ज्यात शस्त्रक्रियेच्या पध्दतीमार्फत जिवंत किंवा मृत व्यक्तिच्या शरीरातील निरोगी अवयव एखाद्या अवयव निकामी होण्याच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णामध्ये प्रत्यारोपीत केला जातो. हा गरजू रूग्णांना उपलब्ध असलेला एक प्रस्थापित शस्त्रक्रिया उपचार आहे.

 

 

 

 

 

अवयवदान म्हणजे नेहमी किडनी दान हा एकमेव गैरसमज नागरिकांचा आहे. अवयव दानांची तस्करी करण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे सहजासहजी किडनी असो वा इतर अवयव दानांच्या प्रतीक्षेतील रुग्णांना मनस्तापासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

 

 

 

अपघातीमृत्यूमध्ये बे्रनडेड व्यक्तीचे हृदय सहा ते आठ तास सुरू असते. अशावेळी व्यक्तीच्या नातेवाइकांनी त्वरित निर्णय घेऊन अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज ाहे.
किडनीसह इतरही अवयव हृदय, यकृत,फुफ्फुस, ,स्वादुुपिंड यांचे दान केले जाते. या अवयवांचीही तितकीच गरज असते.

 

 

 

 

 

अवयवदानानंतर कोणतीही विद्रूपता येत नाही दात्याला शस्त्रक्रिया कक्षात नेऊन अवयव काळजीपूर्वक काढून घेतात. दात्याचे शरीरावर कापलेले, जीवंत व्यक्तीवर केलेल्या शस्त्रक्रियेप्रमाणेच व्रण दिसतात.
नाशिक जिल्ह्यात किडनीची आवश्यकता असलेले रुग्ण आजही प्रतीक्षेत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

यापैकी घरातील व्यक्तींकडून किडनी मिळण्याचे प्रमाण देखील 20 टक्के आहे. म्हणजे दरवर्षी जवळपास – रुग्णांना घरातील नातेवाइकांकडून किडनी मिळाल्याने प्रत्यारोपण करण्यात आलेले आहे. तरीदेखील आज अवयवदानाचे प्रमाण जिल्ह्यात कमी असल्याने प्रतीक्षा यादीतील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरमहिन्याला नाशिक जिल्ह्यात जवळपास 40-45 रुग्णांचे डायलिसिस होते. तफावत कमी करून यासाठी अवयवदानाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.

 

 

 

 

 

मेंदू स्तंभ मृत्यू / ब्रेन स्टेम डेथ

मेंदू मृत्यूची घोषणा ब्रेन डेथ कमिटी करते. ज्यात सरकारने मान्यता दिलेल्या चार डॉक्टरांची टिम असते. जे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात सहभागी नसतात. टीमला मेंदूच्या स्टेमच्या मृत्यूची किमान तासांच्या अंतराने दोन वेळा चाचणी करावे लागते. या मृत्युची घोषणा प्रत्यारोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयात केली जाते. मेंदू मृत्यू जगात सर्वत्र स्वीकारला जातो आणि नातेवाइकांना प्रमाणपत्र दिले जाते.

 

 

 

 

 

कोण करु शकते अवयवदान?

वय वर्षे 18 पुढील कुणीही व्यक्ती मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा (सुधारणा ) नुसार आपण आपले अवयव फॉर्म नं.7 च्या नुसार दान करायची शपथ घेऊ शकताअवयव मेंदू मृत झाल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तिचेच मिळवता येतात.

 

 

 

 

 

 

अवयव दान कधी करता येते.
अवयव दान कधी करता येतात कुठल्याही वयात आपला मेंदू स्तंभ / ब्रेन स्टेम डेथ मृत झाल्यामुळे मृत्यू झाला तर आपण हृदय, यकृत, दोन्ही मुत्रपिंडे, स्वादु पिंड, आतडी, फुफ्फुसे, हात, मध्य कानातील हाडे, कार्टीलेज, हृदयाची झडप आदी दान करू शकते. नैसर्गिक किंवा हृदय मृत्यु डोळे (नेत्रपटल), त्वचा आणि इतर ऊती हृदयबंद पडल्याने मृत्यू झाला तरच दान करता येते. वय वर्षे पुढिल एखादी जीवंत व्यक्ति आपले मुत्रपिंड (कारण आपल्याला दोन मुत्रपिंड असतात) किंवा यकृताचा काही भाग, स्वादूपिंडाचा काही भाग बोनमॅरो यासारखे ठराविक अवयव

त्याच्या / तिच्या जवळच्या नात्यातील व्यक्तिला दान करू शकते.

 

 

 

 

 

 

 

मेंदूमृत रुग्ण म्हणजे काय?
ज्या व्यक्तीचा रस्तेअपघातात किंवा इतर अपघातात मेंदूला जबर मार लागून मेंदू निकामी होतो परंतु हृदय सहा ते आठ तास सुरू राहते अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी तात्काळ निर्णय घेवून रुग्णाचे सुरू स्थितीतील अवयव गरजवंत रुग्णाला दान केले जातात.
अशा मेंदूमृत रुग्णांची संख्या वाढत असली तरी अशा मेंदूमृत रुग्णांचे अवयव दान करण्यासाठी त्यांचे नातेवाईक पुढे येत नाही .भारतीयांचे पौराणिक कथा पुर्वापार चालत आलेले गैरसमज, यामुळे अवयव दानासंबधीत उदासिनता दिसून येते.

 

 

 

 

 

कायदेशीर मान्यता।
भारतात मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम पारित करण्यात आला जो क्षेत्रे व्यापतो. तो मेंदूच्या स्टेमच्या मृत्यूला मान्यता देतो तो औषधोपचारी हेतूंसाठी अवयव काढून घेणे, संग्रहीत करणे आणि त्यांचे प्रत्यारोपण करणे यांचे नियमन करतो. तो मानवी अवयवांच्या व्यापारी व्यवहाराला प्रतिबंध करतो. कोणत्याही मानवी अवयवांची खरेदी किंवा विक्री करता येत नाही.

 

 

 

 

 

 

 

 

मागील पाच वर्षांतील अवयवदान

मेडिकव्हर हॉस्पिटल- 04
अपोलो -02
न्यू ऋषीकेश -03
वोक्हार्ट 0
सह्याद्री 01
चतझ मेडीकल-00
ए व्ही पी मेडिकल कॉलेज00
सिक्स सिग्मा 01
संदर्भ सेवा रुग्णालय00

 

 

 

 

 

 

 

 

 

अवयव दानासाठी सातत्याने जास्तीत जास्त जनजागृती वाढविणे ही काळाची गरज आहे.
शासनाच्या नियमानुसार ब्रेन डेड व्यक्ती सर्टिफाय होणे खूप महत्त्वाचे आहेत त्यासाठी न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, आय सी यु इंटेन्सिविस्ट, आणि हॉस्पिटल प्रशासन यांचा पुढाकार खूप महत्त्वाचा आहेत
ब्रेन डेड ही संकल्पना रुग्णाचे नातेवाईक, मेडिकल, पॅरा मेडिकल स्टाफ, यांच्यापर्यंत पोहोचविणे खूप महत्त्वाचे आहेत.
अवयवदानचळवळीत अवयवदान साठी सततचा प्रयास करणे हे देखील खूप महत्वपूर्ण आहे
डॉ. नागेश अघोर
किडनी विकार, प्रत्यारोपण तज्ज्ञ

 

 

 

 

 

 

नाशिकमध्ये अवयवदान करणार्‍यांची संख्या खूप कमी आहेत. एक अवयव प्रत्यारोपण समन्वयक म्हणून शासनाने सर्व सरकारी /खाजगी रुग्णालयातील कार्यरत न्यूरोलॉजिस्ट,न्यूरोसर्जन, इंटेन्सिव्हिस्ट, हॉस्पिटल प्रशासन यांना आदेश द्यावेत की त्यांनी कार्यरत हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेड व्यक्तीची घोषणा करावी. अवयवदानासाठी विनंती करावी नाही.
अमोल दुगजे(अवयव प्रत्यारोपण समन्वयक,नाईन पर्ल्स हॉस्पिटल)

 

 

 

 

 

 

 

 

 

रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्व पटवून देऊन त्याविषयी असलले गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. यासाठी हॉस्पिटल्स, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक, आणि शासन यांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर अभ्यासक्रमांमध्ये अवयवदानाचे महत्व समजावून सांगितले पाहिजे. तसेच अवयवदानाची चळवळ आणखी भक्कम करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
डॉ. मोहन पटेल
किडनी प्रत्यारोपण तज्ञ
अपोलो हॉस्पिटल,
नाशिक

 

 

 

 

 

 

 

 

 

Devyani Sonar

Recent Posts

नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण, कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…

15 hours ago

सुला फेस्टचा समारोप

*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…

3 days ago

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…

3 days ago

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…

5 days ago

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…

6 days ago

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…

6 days ago