अति आत्मविश्‍वास नसावा : अभिनेते प्रशांत दामले

दि. न्यू एज्युकेशन इन्स्टिटयूटतर्फे अक्षय्य पुरस्कार प्रदान
नाशिक : प्रतिनिधीअभिनय क्षेत्र असो वा इतर कोणतेही क्षेत्र असतो त्यात काम करत असताना आपल्याला काय येत आणि काय येत नाही याची माहिती असायला हवी त्याचप्रमाणे काम करताना आत्मविश्‍वास असायला असावा पण अतिआत्मविश्‍वास नसावा असे  विचार अभिनेते प्रशांत दामले यांनी  व्यक्त केले.
दि. न्यू एज्युकेशन इन्स्टिटयूटतर्फे रंगभूमीवरील कारकीर्दीबद्दल अक्षय्य पुरस्कार देऊन  काल सोमवार (दि.30) रोजी कालिदास कलामंदिर येथे सन्मान करण्यात आला. यावेळी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते.
25 हजार रुपये रोख,सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. 2016 पासून संस्थेच्या वतीने अक्षय्य पुरस्कार देण्यात येतो.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, नाट्य परिषदेचे अध्यक्ष  रविंद्र कदम , संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले आदी मान्यवर उपस्थित होते.
सुधीर गाडगीळ यांनी आपल्या खुमासदार शैलीत घेतलेल्या मुलाखतीत प्रशांत दामले यांनीही दिलखुलासपणे उत्तरे दिली.
गायनाचे शिक्षण घेतले नाही पण लहानपणापासूनच गायनाची आवड होती त्यामुळे शाळेत असताना विविध स्पर्धेत भाग घेत गायन करत होतोे. दहावीत असताना  गायनासाठी बक्षिस मिळाले त्यामुळे गायन आपल्याला जमतय अस वाटले आणि गाणे शिकण्याचे ठरवले पण गाणे शिकणे अद्याप जमले नाही असे ते म्हणाले. नाटकात अशोक पत्की यांच्यासोबत 63 गाणी गायली आणि ती गाणी प्रेक्षकांना आवडली. सारेगमपामध्ये सहभागी झालो तो अनुभव अविस्मरणीय होता.
निर्माता चांगला असेल तर नाटक उत्तम होते. नाटकात 22 विभागा असून प्रत्येकाचे काम चांगले असते. पण कोणीही परिपूर्ण नाही. एकाची चुक झाली तर समोरच्यांनी सावरल तर नाटक ठेपाळत नाही. तसेच ते काम करत असलेल्या अनेक नाटकाच्या टीम कित्येक वर्ष एकत्रित आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी तिने सिनेमातील कारर्किर्दीविषयी भाष्य करत 30 हून अधिक चित्रपटात काम केल्याचे सांगितले. नाटकात अभिनय करताना अभिनेत्री कविता लाड आणि अभिनेते विनय येडेकर यांच्यासोबत ट्युनिंग चांगल जमत असे ही ते म्हणाले.
अभिनेता असताना निर्माता म्हणून वाटचाल करताना काळजी घ्यावी लागते कारण स्पर्धा असली शह काटशह असतात , मी कोणत्या गटाचा तटाचा नाही जो उत्तम काम करेल तो  माझा असे माझे तत्व असल्याने आतपर्यंत वाटचाल चांगली सुरू आहे.
राजा गोसावी, अशोक सराफ, शरद तळवकर, सुधीर जोशी  यांचा अभिनय आवडतो. आणि मी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न केला.
नविन पिढीत  अभिनेता उमेश कामत आणि संर्कषण कर्‍हाडे विश्‍वाहार्य अभिनेते वाटतात.असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या मुलाखतीत मांडले.

प्रकाश वैशंपायन म्हणाले, दामलेंचा नाटकांच्या प्रयोगाचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही. त्याचप्रमाणे सर्वसामान्य प्रेक्षक नाटक , चित्रपटापासून दूर जात आहे त्यासाठी माफक दरात तिकीट ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.  कलावंत हे समाजाला  दृष्टी देणारे असतात,  आपली दु:ख बाजूला सारून वावरतात.
यावेळी उडान या विशेष अंकाचे प्रकाशन झाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले .त्यानंतर ऋतुजा नाशिककर यांनी स्वागत गीत सादर केले.परिचय अनुराधा बस्ते यांनी केला. सन्मानपत्राचे वाचन डॉ.वेदश्री थिगळे यांनी केले.चित्रकार राजेश सावंत    यांनी साकरलेले पोर्टेट दामलेना भेट देण्यात आले.  कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रविंद्र कदम यांनी केले. सूत्रसंचालन अमृता कविश्वर तर आभार अमिता भट यांनी मानले.
तिकीट दर माफक ठेवण्यास प्रयत्नशिल पण ..
संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशपायंन यांनी माफक तिकीट दराबाबत केलेल्या वक्तव्यावर अभिनेते प्रशांत दामले यांनी मुलाखतीच्या सुरूवातीला सांगितले की मुंबईत नाटकाचे सर्वात कमी तिकीट 100 आहे. या तिकीटाला प्रेक्षकही प्रतिसाद देतात. मध्यंतरी नाशिक आणि पुण्यात सर्वात कमी तिकीट 150 रूपये ठेवले होते.मात्र प्रेक्षक पुढील रांगेतील तिकीट काढण्यात स्वारस्य दाखवत असल्याने 150 रूपये असलेली तिकीट विकली गेली नाहीत. तसेच मुंबईबाहेर प्रयोग असल्यास इतर खर्चही वाढत असल्याने तिकीट दर कमी ठेवणे परवडणारे नसते.

वेळेचे नियोजन हवेच
अभिनेते प्रशांत दामले यांनी वेळेचे वेळ देऊन नियोजन केले तरच वेळेवर काम होतात असे सांगत यशाचे रहस्य सांगितले.

टाईपिंग परीक्षेत राज्यात तिसरे …..
शिक्षण सुरू असताना टाईपिंगची परिक्षा दिली त्यात  राज्यात तिसरा आल्याचेही दामले यांनी सांगितले.

देवावर श्रध्दा पण…
देवावर श्रध्दा आहे पण त्या श्रध्देचा अतिरेक करत नाही. वर्षातून दोन वेळा गुरूचरित्र पारायण करत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

सांगा कसे जगायच…
मुलाखतीचा समारोप प्रसंगी सांगा कसं जगायचं कन्हत कन्हत की रडत… या गाण्याच्या ओळी  गुणगुणत दामले यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Ashvini Pande

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

1 day ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

2 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

3 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

3 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

3 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

4 days ago