आरोग्य

रिकाम्या पोटी चुकूनही हे खाऊ नका, आरोग्यास हानिकारक!

आरोग्यासाठी अन्न किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू लागते, परंतु त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे आणि उठल्यानंतर किमान दोन तासांनी नाश्ता केला पाहिजे.
मसालेदार जेवण
रिकाम्या पोटी मसाले आणि मिरच्या खाल्ल्याने पोटाच्या अस्तराला त्रास होतो, ज्यामुळे आम्लीय प्रतिक्रिया आणि पोटात मुरडून येते. मसाले तिखट असतात, जे अपचन वाढवू शकतात. त्यामुळे सकाळी तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळा. बरेच लोक समोसे, कचोरी, पकोडे आदींचे सेवन करतात. सकाळच्या नाश्त्यात ते टाळा.
ज्यूस ः
आपल्यापैकी अनेक जण दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक ग्लास फळांचा ज्यूस घेतात, परंतु हे अजिबात चांगले नाही कारण रिकाम्या पोटी ज्यूस प्याल्याने पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो, जे शरीरासाठी चांगले नाही.
दही ः
दह्यात लॅक्टिक अ‍ॅसिड असते, जे पोटातील अ‍ॅसिडिटी पातळीला त्रास देते. रिकाम्या पोटी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने त्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करते, ज्यामुळे अ‍ॅसिडिटी वाढते. त्यामुळे सकाळी दही खाऊ नये.

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

12 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago