नाशिक

एम.डी. ड्रग्ज विक्री करणारे दोन आरोपी अटकेत

हजारो रुपयांचा मॅफेड्रॉन जप्त

सिडको ः विशेष प्रतिनिधी
विहितगाव परिसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) सारख्या अमली पदार्थांची विक्री करणार्‍या दोन तरुणांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 30 हजार रुपये किमतीचा मॅफेड्रॉन जप्त करण्यात आला असून, उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दि. 29 मे 2025 रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी सोमेश्वर उर्फ बाळा उत्तम हांगरगे (वय 27, रा. स्वागत बिल्डिंग, विहितगाव) आणि साहिल मोहन निकम (वय 23, रा. हरीपुरा अपार्टमेंट, विहितगाव) हे
मॅफेड्रॉन विक्रीसाठी महाराजा बसस्टॉप परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. त्यांच्याकडून 6 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 30,000 रुपये इतकी आहे. याप्रकरणी दोघांविरोधात एन.डी.पी.एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
दरम्यान, सोमेश्वर हांगरगे याच्यावर यापूर्वीही उपनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, पोहवा भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, पोलीस नाईक संतोष सौंदाणे, पोलीस अंमलदार गणेश वडजे, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांदे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे आणि महिला पोलीस अर्चना भड आदींनी केली.

 

Editorial Team

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

31 seconds ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

6 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

9 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

12 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

19 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

33 minutes ago