आ. सरोज आहिरेंनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
नाशिक : प्रतिनिधी
रिंगरोड विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी देवळाली मतदारसंघातील अनेक शेतकर्यांच्या जमिनी या त्यांच्याकडील उपजीविकेचे तेवढेच साधन आहे. त्यामुळे भूसंपादन करताना शेतकर्यांसह बाधितांवर अन्याय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार सरोज आहिरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन चर्चेदरम्यान केली.
आमदार आहिरे म्हणाल्या, की अलीकडे सक्तीने भूसंपादन होणार असल्याच्या बातम्यांमुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, ते दूर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. आ. आहिरे यांचे म्हणणेे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गांभीर्याने ऐकून घेत शेतकरीहिताला प्राधान्य देत सकारात्मकता दर्शवली. संबंधित शेतकर्यांना विश्वासात घेऊन महापालिका आयुक्त, एमएसआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व भूसंपादन अधिकार्यांची संयुक्त बैठक आयोजित करून सर्व अडचणी समजून घेण्याबाबत तत्परता दाखवली. शेतकर्यांशी संवाद साधून, योग्य मोबदला व पर्यायी उपाययोजना यावर चर्चा करूनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आ. आहिरे यांना देण्यात आले. शेतकरीकेंद्रित दृष्टिकोनातून निर्णय घेणे ही स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीची ओळख असून, त्याच धर्तीवर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा आ. आहिरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या भेटीतून रिंगरोड भूसंपादन प्रक्रियेत संवाद व समन्वयातून तोडगा निघण्याची आशा शेतकरीवर्गात निर्माण झाली आहे. यावेळी निवृत्ती अरिंगळ्े, विक्रम कोठुळे, विनोद देशमुख, दीपक हगवणे, सुरेश पिंगळे, योगेश रिकामे आदी उपस्थित होते.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…