दुचाकीस्वार जखमी
सातपूर : प्रतिनिधी
पाइपलाइन रोड, रामेश्वरनगर परिसरात काल दुपारी अडीचच्या सुमारास महिंद्रा शोरूमच्या ट्रायलसाठी आलेल्या चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून जाणार्या एका दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रामेश्वरनगर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेती व माती पसरलेली होती. त्यातच महिंद्रा शोरूमची ट्रायल गाडी वेगात असल्याने रस्त्यावर पसरलेल्या रेतीवरून ती घसरली आणि चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी समोरून येणार्या दुचाकीला गाडीची धडक बसली. नागरिकांनी तत्काळ जखमी दुचाकीस्वाराला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणीचे काम सुरू होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…