संपादकीय

महाजनांना नकोय आमदार समर्थक महापौर?

अडीच हजार कोटींचे बजेट, दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मुख्य वैशिष्ट्यांमुळे नाशिक देशातील प्रमुख शहर ठरते. त्यातच दीड वर्षाने सिंहस्थ कुंभमेळा होत असून, त्याकरिता हजारो कोटींची कामे होणार आहेत. त्यापूर्वी महापालिकेचे कारभारी ठरवले जाणार आहेत. मनपातील सत्तेसाठी भाजपने फोडाफोडी करत शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँगे्रस पक्षाला सुरुंग लावलाय. गंमत म्हणजे, बाहेरील लोकांना भाजपत्रयी आमदारांचा तीव्र विरोध आहे. मात्र, तो डावलत मंत्री गिरीश महाजनांनी पक्षप्रवेशास हिरवा कंदील दाखवला. या पक्षप्रवेशामागे संकटमोचकांची विशेष रणनीती असल्याची चर्चा भाजपात सुरू झाली आहे. महापालिकेत सत्ता आल्यास महापौर व स्थायी समिती सभापती या महत्त्वाच्या पदांवर आमदार समर्थक नगरसेवक नको. त्यांना दूर ठेवण्याकरिता भाजपात बाहेरून आलेल्या पदाधिकार्‍यांच्या गळ्यात महापौर, स्थायी सभापतिपद टाकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्थानिक आमदारांचा विरोध डावलून ना. महाजन विरोधी पक्षांतील पदाधिकार्‍यांना घेण्यासाठी अट्टहास करत आहेत का? असा सवाल केला जातो आहे.

भाजपमध्ये नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेशाची सर्वत्र चर्चा आहे. माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ, मनसेचे दिनकर पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या प्रवेशाने रणकंदन झाल्याचे दिसले. या प्रवेशामुळे भाजपवर स्वपक्षातीलच पदाधिकारी, कार्यकर्ते टीका करत आहेत. त्यामुळेच सध्या भाजप विरुद्ध भाजप असे काहीसे चित्र नाशिकमध्ये आहे. भविष्यात जे लोक इतर पक्षांतून आले आहेत, त्यांच्यात व निष्ठावंतांत संघर्ष होण्याची शक्यता आहे. महापालिकेत सत्ता आल्यास पक्षातीलच नगरसेवक एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. असे चित्र यापूर्वीही दिसून आले आहे. दिनकर पाटील यांनी महापालिकेत भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. आता तेच दिनकर पाटील पुन्हा स्वगृही आले. विद्यमान परिस्थितीत भाजपने शंभर प्लससाठी सारे गुन्हे माफ, या उक्तीप्रमाणे प्रवेशासाठी आपले दरवाजे खुले केलेे आहेत. भाजपकडे प्रभाग 13 मध्ये प्रबळ उमेदवार असतानाही दुसर्‍या पक्षातील नेत्यांना प्रवेश का दिला जातोय? प्रभाग 13 च नव्हे, तर यापूर्वी इतर प्रवेशालाही भाजप आमदार, पदाधिकार्‍यांचा विरोध होता. मात्र, त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत विरोधी पक्षांतील नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेतले गेले.
दीड वर्षाने सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, कोट्यवधींची कामे याद्वारे केली जाणार आहेत. निवडणुकीनंतर महापौर व स्थायी सभापतीची भूमिका महत्त्वाची असेल. तत्पूर्वी, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, अर्ज भरण्याचे अखेरचे दोन दिवस आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने शिवसेना ठाकरे गट, मनसे व काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम करत धक्के दिले. मात्र, या प्रवेशावरून भाजपवरच प्रश्न केले जात आहेत. त्यातील एक म्हणजे, पक्षाकडे उमेदवार असतानाही त्यांना डावलून बाहेरील लोकांना का प्रवेश दिला जातो? भाजपला अद्यापही उमेदवार निवडून येणार नाहीत म्हणूनच विरोधी पक्षांतील पदाधिकार्‍यांना फोडले जाते आहे का? दरम्यान, आमदारांच्या अखत्यारित प्रभागावर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही का? यावरून चर्चा होते आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या डोळ्यांत त्यामुळेच अश्रू तरळले. विधानसभेत ज्यांनी आपल्यासाठी काम केले, त्यांना उमेदवारीचे आश्वासन दिले असताना ऐनवेळी विरोधी पक्षांतील लोकांना घेतले जाणे, हा आमदारांवरच अविश्वास दाखविण्यासारखे आहे. प्रभाग 13 मध्ये आ. फरांदे यांनी हरिभाऊ लोणारी, गणेश मोरे व नुकतेच पक्षात आलेले बबलू शेलार जे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे आहेत. या तिघांसह आणखी एक याप्रमाणे पॅनल तयार केले जाणार. तोच माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ, माजी नगरसेवक शाहू खैरे आदींना प्रवेश देत आ. फरांदे यांना महाजन यांनी धक्का दिला.
दरम्यान, विधानसभा निवडणूक झाल्यापासून भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ सुरू आहे. यात पक्षनिष्ठा व राजकारणात नीतिमत्तेला कशी मूठमाती दिली जाते, हे समस्त नाशिककरांना पाहावयास मिळाले. नुसतेच पाहावयास मिळाले नाही, तर त्याचा अनुभवच घेतला. 24 तासांपूर्वी ज्या पक्षावर टीका केली जात होती, अगदी सुपडा साफ करण्याची भाषा सुरू होती. दुसर्‍याच दिवशी त्याच पक्षाचे उपरणे गळ्यात टाकून विनायक पांडे, दिनकर पाटील यांचा पक्षप्रवेश होतो. मात्र, हे कोणत्या राजकारणात बसते, असा प्रश्न सध्यातरी नाशिककरांना पडला असेल. मात्र, सध्या पक्षनिष्ठा पायदळी तुडवल्याचे चित्र आहे. आमदारांची इच्छा नसताना त्यांच्या विरोधाला मुरड घालून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, मनसे व काँग्रेस या पक्षांतील माजी नगरसेवक, पदाधिकार्‍यांना मागील काही दिवसांत प्रवेश दिले गेले. पुढेही काही प्रवेश होण्याची शक्यता आहे. मात्र, या पक्षप्रवेशामागे संकटमोचकाचीच खेळी असल्याचे बोलले जात आहे.

               – गोरख काळे

Don't Mahajan want a pro-MLA mayor?

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago