रस्ता खचल्याने डंपर थेट खड्ड्यात

सातपूर : प्रतिनिधी
नाशिकमध्ये रस्त्यांची गुणवत्ता आणि रस्त्यांवरील खड्डे हे मुद्दे गाजतच असून, काल नवश्या गणपती भागात खडीने भरलेला डंपर खडी उतरवत असताना रस्ता खचल्याने थेट खड्ड्यात अडकला. सुमारे दहा ते बारा फूट खोल खड्डा पडल्याने हा डंपर अडकून पडला. त्यामुळे महापालिकेने खोदकाम केल्यानंतर रस्ता बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे त्याचा फटका बसत आहे.
काल दुपारी नवश्या गणपती भागात खडीने भरलेला डंपर खाली करत असतानाच खडीचा बोजा सहन न झाल्याने डंपर थेट दहा ते बारा फूट खोल खड्ड्यात रुतला. रस्ता खचल्यामुळे डंपरची पुढची दोन्ही चाके थेट वर झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीच प्राणहानी झाली नाही. मात्र, मनपाच्या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून 80 टक्के खड्डे बुजवल्याचा आणि कामाची गुणवत्ता चांगला असल्याचा दावा केला जात असतानाच, दुसरीकडे ही मोठी दुर्घटना समोर आली आहे.
पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभरात काम सुरू आहे. रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीज तसेच पायाभूत सुविधांचे काम एकाचवेळी सुरू आहेत. त्यामुळे नाशिककरांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये सात निष्पाप जीवांचा बळी गेला आहे.

Dumper plunges into pit after road caves in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *