संशयिताला अटक; 24 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
इगतपुरी : प्रतिनिधी
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर इगतपुरी-कसारा घाट परिसरात दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दगडफेकीत ट्रेनच्या ए-1 कोचमधील खिडकीची काच फुटली. प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्या या प्रकाराची रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) गंभीर दखल घेत संशयिताला तत्काळ अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. 10) सकाळी 6:35 वाजता ट्रेन क्रमांक 12290 अप दुरांतो एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती आरपीएफला मिळाली. इगतपुरी-टीजीआर 1 रेल्वे मार्गावरील किलोमीटर क्रमांक 135/217 जवळ ही घटना घडली. दगडफेकीमुळे ए-1 कोचमधील बर्थ क्रमांक 5 जवळील खिडकीची काच फुटल्याची माहिती ऑनड्युटी टीटीईने दिली. माहिती मिळताच आरपीएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरात शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळापासून सुमारे 500 मीटर अंतरावर डोंगराळ व जंगल परिसरातील रस्त्यावर संशयित व्यक्ती आढळून आली. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव संजय तातू सोनवणे (वय 43, रा. चिमणवाडी, सिद्धार्थनगर, इगतपुरी) असल्याचे सांगितले.
अधिक चौकशीत त्याने मुंबईच्या दिशेने जाणार्या ट्रेनवर दगड फेकल्याची कबुली दिल्याचे आरपीएफने स्पष्ट केले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
संशयिताची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला इगतपुरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 24 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास आरपीएफ पोस्ट इगतपुरीचे एएसआय एस. बी. तिडके करत आहेत.
Duronto Express pelted with stones near Igatpuri
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…