नाशिक

वडाळा-पाथर्डी रोड परिसरात दुकानात चोरी

कलानगर चौकातील सुदर्शन मेडिकलचे शटर वाकवून ऐवज लंपास

सिडको : प्रतिनिधी
वडाळा-पाथर्डी रोडलगतच्या परिसरात सलग दुसर्‍या आठवड्यात दुकानफोडीच्या घटना सुरूच असून, रविवारी (दि. 9) मध्यरात्री दोन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कलानगर चौकातील सुदर्शन मेडिकलचे शटर कशाच्या तरी सहाय्याने उचकावून दुकानातील रोख रकमेसह किमती साहित्य असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय अनिल बागड (रा. विजयनगर, सिडको) यांचे कलानगर चौकात सुदर्शन मेडिकल नावाचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील 45 हजार रुपये रोख, तसेच कॅडबरी, दाढी करण्याचे साहित्य, पेन क्लीनर सिरपच्या दोन बाटल्या, सॅनिटरी पॅड आणि सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर असा किमती ऐवज लंपास केला.
चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने डीव्हीआरही सोबत नेल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

दुकानफोडीच्या मालिकेने पोलिसांसमोर आव्हान

वडाळा-पाथर्डी रोडलगत गेल्या आठवड्यात पतंजली स्टोअर, माऊली ज्वेलर्स, संसार शोभा स्टील आणि स्वामी कलेक्शन या दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले होते. त्यानंतर आता मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कलानगर चौकातील सुदर्शन मेडिकलमध्येही घरफोडी झाल्याने दुकानफोडीच्या मालिकेने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच इतर बाबींच्या आधारे सखोल तपास करण्यात येत आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

17 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago