ई टॉयलेट जाहिरातीच्या ई-टेंडरिंगचा कामात गुंतवणूकीचे आमिष देख 6 कोटींचा गंडा

नाशिक : वार्ताहर
राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाच्या ई टॉयलेट जाहिरातीच्या ई-टेंडरिंगचा कामात गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा नफा  असल्याचे आमिष दाखवून नाशिकमधील युवकांसह व्यावसायिकांना तब्बल ६ कोटी ८० लाखांना गंडवण्यात आले आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुजरात राज्यातील  1) सचिनभाई पुरूषोत्तमभाई वेलेरा रा.4 भावकुंज सोसायटी, जोधपुर अहमदाबाद सिटी मानेकबाग गुजरात 2) वैभव गेहलोत रा.दडो का बस सरदारपुरा जोधपुर. 3)  किशन कान्तेलीया 4)  सरदार सिंग चौहान 5) नीडल काफ्टसाठी अधिकृत इसम 6) प्रविण सिंग चौहाण 7)  सुहास सुरेंद्रभाई माकवाल 8) निरवभाई महेशभाई विर्माभट 9) बिस्वरंजन मोहंती 10 ) राजबिरसिंग शेखावत 11) प्रग्येशकुमार विनोदचंद्र प्रकाश 12) संजयकुमार दे 13 ) सावनकुमार पारनेर 14) रिशिता शाह 15) विराज पांचाल यातील  03 ते 15 यांचा पत्ता माहीती नाही.
आदी संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा सुशील भालचंद्र पाटील (वय 33, रा. ओंकार बंगला, गीतांजली को-ऑपरेटिव्ह सोसायटी, वाघ गुरुजी शाळेसमोर, पंपिंग स्टेशन गंगापूर रोड) याच्या फिर्यादी वरून दाखल करण्यात आला आहे.
 तक्रारीनुसार संशयितांनी संगणमत करून विश्वास संपादन केला. राजस्थान सरकारच्या नावाने ही ई टॉयलेट पर्यटन विभागाच्या जाहिरातीसाठी केंद्राचे संपूर्ण राज्याचे कामकाज सामाविष्ट आहे. त्यात गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा नफा मिळू शकतो, असे खोटे आश्वासन देत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुशील पाटील व संबंधित व्यावसायिकांकडून २०१८ ते २०२० दरम्यान ३ कोटी ९३ लाख ५४ हजार ७८८ रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच उर्वरित रोख रक्कम घेतली. असा एकूण सहा कोटी ८० लाखांचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.  पुढील तपास उपनिरीक्षक संजय भिसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *