नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या पर्यावरण विभागाने उशिराने का होईना महापालिकेत पर्यावणपूरक गणेशमूर्तीचे स्टॉल लावले आहेत. गणेशाचे उद्याच थाटात मोठ्या उत्साहाने स्वागत होणार आहे. दरम्यान, पर्यावरणाच्या दृष्टीने महापालिका दरवर्षी शाडू मातीचे गणपती मूर्तीचे स्टॉल लावत असते. यंदा मात्र काहीसा उशीर झाल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, राजीव गांधी भवन येथील कार्यालयासह अंबड व सातपूर येथे स्टॉल्स
लावले आहेत.
गणेशोत्सवात पर्यावणपूरक मूर्तीची विक्री व्हावी यासाठी महापालिका पर्यावरण विभाग व संगमनेर येथील लिबर्टी आर्ट यांच्यातर्फे महापालिकेच्या गेल्या तीन वर्षांपासून हे स्टॉल्स महापालिकेच्या माध्यमातून लावले जात असून, शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार तयार केलेल्या मूर्तीच स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तीमध्ये रासायनिक रंग न भरणे, निर्माल्याचे व्यवस्थापन करणे, तसेच निर्मिती केंद्र व विक्री केंद्रांवर स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृती करणे हे निर्देश
दिलेले आहेत. लिबर्टी आर्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्टॉल्सला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षी तीन हजार मूर्ती विक्री केल्याचे संचालक हेमंत जोर्वेकर यांनी सांगितले. शाडू, लाल मातीसह पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या असून स्टॉल्समध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या 80 टक्के मूर्ती महिला कारागिरांनी बनविल्या आहेत.
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मनपाचे हे महत्त्वाचे पाऊल असून सर्वच नाशिककर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचीच प्रतिष्ठापना करावी. शिवाय अल्प दरात महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरण पूरक गणेश मूर्ती उपलब्ध करून दिल्या आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाला लिबर्टी अर्थच्या माध्यमातून गणेशमूर्तीचे स्टॉल लावले आहेत.
– नितीन पवार, उपायुक्त, पर्यावरण तथा गोदावरी
संवर्धन विभाग
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…