पर्यावरणपूरक पतंगोत्सव

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन व काचेचे कोटिंग असलेले धागे सर्वत्र वापरले जातात. पक्षी, प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होऊन जखमी, तसेच गतप्राण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा घातकी मांजाने रस्त्याने जाणारे दुचाकीस्वार, तसेच सायकलवरील विद्यार्थी जखमी झाले आहेत, तर काहींचा मृत्यूही झाला आहे. पक्ष्यांनाही गंभीर दुखापती होतात. पतंगोत्सव आपल्यासह इतरांसाठीही सुरक्षित राहील ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.साधा दोरा वापरत पर्यावरणपूरक पतंगोत्सव साजरा करा. आकाशात पतंगाचे पेच लढताना कोणाचेही आयुष्य ’पेचात’ सापडणार नाही याची प्रत्येक पतंगप्रेमीने दक्षता घ्यावी. – राहुल बसवे

Eco-friendly kite festival

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *