नाशिक

शिक्षणमंत्र्यांचे गाव अपार आयडी नोंदणीत माग

शालेय शिक्षणमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सुनावले खडे बोल

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची आढावा बैठक शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.13) झाली. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, भास्कर कनोज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) रवींद्र परदेशी, आरोग्य विभागाचे उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंंद्र बागूल आणि तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
मालेगाव येथील विद्याथ्यार्ंची अपार आयडी नोंदणी सर्वांत कमी असल्याचे (77.63 टक्के) भुसे यांच्या निदर्शनास आल्याने संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली. येत्या 30 जूनपर्यंत नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी वाचन, गणितात पाचवी, सातवीतील मागे असलेले विद्यार्थी पुढे जावेत यासाठी उपक्रम राबविला जातो. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील एकूण चार हजार 173 पैकी तीन हजार 688 शाळांनी (88 टक्के) नोंदणी पूर्ण केली आहे. 485 शाळांनी (11.62 टक्के) नोंदणी केलेली नाही. मालेगाव मनपा क्षेत्रात 54.72 टक्के शाळा नोंदणीकृत; परंतु विद्यार्थी नोंदणी केवळ 36.1 टक्के आहे. ही चिंतेची बाब आहे. या नोंदणीची टक्केवारी 30 जूनपर्यंत वाढवावी, असे आदेश त्यांनी दिले. भुसे पुढे म्हणाले, की नवीन शैक्षणिकवर्षाला येत्या सोमवारपासून (दि. 16) प्रारंभ होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे. यावेळी पालकांसह नागरिकांना सहभागी करून घ्यावे. त्या-त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर स्थानिक पोलिस ठाणे, बँका, उद्योजक, समाजातील मान्यवरांच्या हस्ते मुलांचे स्वागत करावे. सध्या राज्यातील अनेक शाळांमध्ये नवीन उपक्रम राबविले जात आहेत. ते त्या शाळेपुरते मर्यादित न राहता सर्व शाळांपर्यंत पोहोचावेत, यासाठी नियोजन केले जाईल. विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडे वाढावा, यासाठी अधिक चांगले आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. यावेळी जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी, सुपर-50 तसेच विविध शाळांत राबविण्यात येणार्‍या नव्या उपक्रमांची व त्याच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

आदर्श शाळा योजनेचे काम अपूर्ण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 20 शाळांच्या इमारत बांधकामास निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, मोठ्या बांधकामात (नवीन इमारतींच्या बांधकामासाठी) 23 शाळांना मंजुरी देण्यात आली आहे. यांपैकी तीन कामे पूर्ण झाली असून, 18 कामे अपूर्ण असल्याचे लक्षात आल्याने मंत्री भुसे यांनी संबंधितगटशिक्षणाधिकार्‍यांना जाब विचारला असता, समाधानकारक उत्तर देता आले नाही. परिणामी भुसे यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशा सूचना केल्या.

अंगणवाड्यांतील मुलांची आरोग्य तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी केली जाते. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंगणवाडीतील मुलांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सीईओ मित्तल यांनी दिली.

शिंदे गावचे सरपंच बाजीराव जाधव यांचा सत्कार

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय शिंदे (ता. नाशिक) गावाने घेतला आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री भुसे, उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते शिंदे गावचे सरपंच बाजीराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

34 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

37 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

51 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

55 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

59 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago