नाशिक

नाशिकमध्ये 26, 27, 28 डिसेंबरला विश्व मराठी संमेलन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन 26, 27 व 28 डिसेंबरला मविप्र संस्थेच्या मैदानावर होणार आहे. परदेशात वास्तव्यास असणार्‍या मराठी भाषिकांना संमेलनासाठी येता यावे म्हणून डिसेंबरमध्ये संमेलन ठेवण्यात आले आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि. 13) राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. 13) विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला आमदार सीमा हिरे, राज्य मराठी विकास संस्थेचेे संचालक डॉ. श्यामकुमार देवरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, समीक्षक रमेश वरखेडे, उद्योजक धनंजय बेळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, साहित्यिक उपस्थित होते. दरम्यान, मराठी भाषेसह परंपरा व संस्कृतीचा जागर जागतिक पातळीवर करण्यासाठी विश्व मराठी संमेलन घेण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून संमेलने घेण्यास सुरुवात करण्यात आली. पहिले व दुसरे संमेलन मुंबईत झाले, तर तिसरे संमेलन पुण्यात झाले होते. चौथे संमेलन नाशिकमध्ये होणार आहे. या बैठकीत मंत्री सामंत यांनी संमेलनासंदर्भात उपस्थितांच्या कल्पना जाणून घेतल्या. यातील चांगल्या कल्पनांना मान्यता देत संमेलनात समावेश करावा, असेही संबंधित अधिकार्‍यांना मंत्र्यांंनी सांगितले.
मंत्री सामंत म्हणाले, की संमेलनाच्या सूक्ष्म पातळीवरील नियोजनासाठी 16 ऑगस्ट रोजी विश्व मराठी संमेलन कार्यालय सुरू करण्यात येईल. राज्यातील परंपरा व संस्कृती जगभरात पोहोचावी यासाठी संमेलनाच्या माध्यमातून वारी, बोलीभाषा यांसह परंपरांचा जागर करण्यात येणार आहे.

या परंपरांचा असेल समावेश

शहरातील साठ ढोल पथकांद्वारे एकत्रित नाशिक ढोल वाजविण्यात येणार. वारी परंपरेचा जागर व्हावा यासाठी संमेलनस्थळी वारी काढण्यात येणार. संमेलनात बोलीभाषांचा जागर करण्यात येणार.
पुस्तक अदानप्रदान हा अभिनव उपक्रम संमेलनात राबविण्यात येणार.

माझी भाषा-अभिजात भाषा उपक्रम राबविण्याची सूचना

सर्व विद्यापीठांत मराठी भाषा- अभिजात भाषा उपक्रम राबविण्याची सूचना मंत्री सामंत यांनी यावेळी केली.

साहित्य म्युझियम साकारले जाणार

बैठकीप्रसंगी झालेल्या चर्चेत वरखेडे यांनी साहित्य म्युझियमची संकल्पना मांडली. या संकल्पनेला मंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीस उपस्थित असलेल्या मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंनी साहित्य म्युझियमच्या निर्मितीसाठी लागणार्‍या खर्चाची जबाबदारी घेणार असल्याचे सांगितले. साहित्य म्युझियम नाशिकमध्ये होणार की, राज्यातील इतर शहरांत, हे सर्वांशी चर्चा करून निश्चित करू, असे मंत्री सामंत म्हणाले. साहित्य म्युझियममध्ये राज्यातील ज्येष्ठ साहित्यिकांची पुस्तके ऑडिओ स्वरूपात ऐकता येणार आहेत.

साहित्यभूषण पुरस्काराच्या रकमेत वाढ

विश्व मराठी साहित्य संमेलनात दोन पुरस्कार देण्यात येतात. एक पुरस्कार साहित्यिकास, तर दुसरा पुरस्कार कलावंतास. मागील संमेलनावेळी साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना देण्यात आला. त्यावेळी पुरस्काराची रक्कम पाच लाख रुपये होती. मात्र, कर्णिक यांनी इतर पुरस्कारांप्रमाणेच याही पुरस्काराची रक्कम असायला हवी, अशी सूचना केली होती. त्यामुळे यंदापासून विश्व मराठी संमेलनात देण्यात येणार्‍या साहित्यभूषण पुरस्काराच्या रकमेत वाढ होऊन साहित्यिकास दहा लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

Editorial Team

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

6 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

27 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

34 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

40 minutes ago