मुबंई: .ओबीसी आरक्षणावर आज अंतिम सुनावणी झाली.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा असे आदेश दिले आहेत.सुप्रीम कोर्टात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर हे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राज्य सरकार आता काय भूमिका घेते यावर लक्ष वेधले आहे. ओबीसी मुद्द्यामुळे ही निवडणूक लांबली होती, सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायची नाही असा निर्णय घेतला होता. इच्छुक उमेदवारांनी तयारी पण केली होती , प्रभागरचना पण ठरली होती, आता दोन आठवड्यात निवडणुका जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.