मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गेली ११ दिवस न्यायालयीन काेठडीत असणार्या राणा दाम्पत्याला माेठा दिलासा मिळाला आहे गेले अकरा दिवस कारागृहात असलेल्या राणा दाम्पत्याची आज सुटका होणार आहे