नाशिक

पाणीपुरवठा सुरू असतानाच वीज होते गायब

सिन्नरकर त्रस्त : ट्रान्स्फॉर्मर ओव्हरलोडमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित, नगरपरिषदेत समस्यांचा पाढा

सिन्नर : प्रतिनिधी
शहरात नळांना पाणी आले की, वीजपुरवठा खंडित होतो, ही समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे महावितरण व्यवस्थेवर ताण वाढला आहे. ट्रान्स्फॉर्मर ओव्हरलोड होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, असे मंगळवारी (दि. 5) झालेल्या महावितरणच्या आढावा बैठकीत स्पष्ट झाले.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढवणे, नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवणे आणि प्रलंबित कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याची मागणी नगरसेवकांनी केली. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तक्रार निवारण मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात येणार आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आमदार कोकाटे अनुपस्थित होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे, नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोड, सहायक अभियंता राहुल कुटे, कनिष्ठ अभियंता वैभव भोरे, नगरपरिषदेच्या विद्युत विभागाच्या अभियंता हर्षदा पुराणिक, विजय वाजे, तुषार पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. शहरातील सर्व 15 प्रभागांमध्ये ट्रान्स्फॉर्मरची क्षमता अपुरी असल्याचे निदर्शनास आले. नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी क्षमतेत वाढ करण्याची मागणी केली. बैठकीत नगरसेवक शेखर गोळेसर, कांताबाई जाधव, सागर भाटजिरे, उदय गोळेसर, मनोज देशमुख, अशोक जाधव, अजय गोजरे, पंकज जाधव, ललिता हांडे, अनिल सरवार, आशा कर्पे, पंकज मोरे, रोहिणी मोरे, सुदर्शन नाईक, सागर कोथमिरे, अमोल झगडे, सुनील गवळी, विजय वरंदळ, शुभम वारुंगसे तसेच हरिभाऊ वरंदळ, योगानंद गवळी, अक्षय कानडी, दत्ता हांडे यांनी समस्या मांडल्या.

ट्रान्स्फॉर्मर सुरू करण्याचे आदेश

नवीन बसविलेले ट्रान्स्फॉर्मर सुरू नसल्याची तक्रार अजय गोजरे, आशा कर्पे व लोकेश धनगर यांनी केली. संबंधित ट्रान्स्फॉर्मर दोन दिवसांत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख यांनी अंडरग्राउंड केबल बॉक्सची दुरवस्था निदर्शनास आणली.

नवीन ट्रान्स्फॉर्मर, केबल प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

प्रभाग 3, 4 व 7 मध्ये नवीन ट्रान्स्फॉर्मर व अंडरग्राउंड केबलसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रभाग क्रमांक 9 मध्ये खासगी डीपीसाठी पैसे घेतल्याच्या तक्रारीवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले. ओव्हरहेड वायरमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याचे नगरसेवकांनी सांगितले. यावर सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कडवा योजनेचा फीडर निष्प्रभ

उदय गोळेसर यांनी कडवा पाणी योजनेचा एक्स्प्रेस फीडर प्रभावी नसल्याचे सांगितले. पाचपट्टा उपकेंद्रातून स्वतंत्र वाहिनीचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. खांब उभारणीला विरोध होत असला, तरी काम पूर्ण केले जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Electricity goes out while water supply is on

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago