नाशिक

सिडकोत विजेचा खेळखंडोबा

नागरिक त्रस्त; आंदोलनाचा इशारा

सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिका हद्दीतील खोडेनगर, विधातेनगर परिसरात वारंवार खंडित होणारा व कमी दाबाने होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली. पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
खोडेनगर, विधातेनगर परिसरात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, वारंवार होणार्‍या वीज खंडित प्रकारांमुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता पानसरे यांची भेट घेत निवेदन सादर केले. परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने तसेच कमी दाबाने वीज मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरांमधील विद्युत उपकरणे वारंवार बंद पडत असून, त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. ‘वर्क फ्रॉम होम’ करणार्‍या नागरिकांचे कामकाजही विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
श्रीकलश अपार्टमेंटपासून येणारी विद्यमान वीज केबल अपुरी क्षमतेची असल्याने तिच्या जागी नवीन व अधिक क्षमतेची केबल टाकणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली. परिसरात अनेकदा 12 ते 24 तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना उकाडा आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक कामे तातडीने पूर्ण करून नियमित आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे; अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी तुकाराम शिरोडे, जगन्नाथ शिरसाट, सुरेंद्र पवार, रमाकांत बडे आणि पंकज गोरे उपस्थित होते.

Electricity scam at CIDCO

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago