डॉ. धनंजय वाखले : बसवंत उद्यानात मधमाशी दिन साजरा
पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
मधमाशी पालन हा व्यापक आयाम लाभलेला कृषिपूरक आणि रोजगाराभिमुख व्यवसाय असून, आपल्या भारतात त्याला विपुल संधी आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या सी.बी.आर.टी.आय. संस्थेचे माजी सहाय्यक संचालक डॉ. धनंजय वाखले यांनी केले. जागतिक मधमाशी दिनानिमित्त येथील बसवंत मधमाशी उद्यानात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पूर्वा केमटेक तथा ग्रीनझोन अॅग्रोकेमचे संचालक विजय पवार, टेक्निकल डायरेक्टर डॉ. भास्कर गायकवाड आणि बसवंत गार्डनचे प्रकल्प संचालक संदीप वाघ व्यासपीठावर होते.
‘ओळख अद्भुत मधमाशांंच्या अलौकिक विश्वाची’ या पुस्तिकेचे विमोचन ‘पूर्वा कृषिदूत’ प्रकाशनाच्या वतीने करण्यात आले. मानवाला अनेक आरोग्यदायी पदार्थांचा लाभ मिळवून देणारी मधमाशी त्याहून अधिक महत्त्वाचे असे वनस्पतींच्या परागीभवनाचे काम करीत असते. तिचे हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य बसवंत मधमाशी उद्यानाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवण्याचा प्रयास असल्याचे विजय पवार यांनी
नमूद केले.
बसवंत गार्डनच्या प्राजक्ता शिंदे आणि श्रद्धा पवार यांनी बसवंत गार्डन आणि बी मॅनेजमेंट गुरू यावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. प्राजक्ता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संदीप वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि.’ संचलित ‘बसवंत गार्डन’च्या वतीने ‘बसवंत अॅपी-अॅग्री टुरिझम फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव 31 मेपर्यंत विविध उपक्रमांसह साजरा होईल.
मिलांज आंबा पुरस्कार जाहीर
दरवर्षीप्रमाणे बसवंत गार्डनमध्ये मिलांज आंबा प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात राज्यभरातील तीनशेहून अधिक शेतकर्यांनी हापूस, केशर यांसह आंब्याच्या विविध दर्जेदार जातींचे नमुने मांडलेले असून, स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे : मिलांज आंबा महाराजा (हापूस) पुरस्कार रवींद्र एकनाथ हेगिष्टेे (करंजारी, रत्नागिरी) यांना तर केशर गटातील पुरस्कार भावनाबेन मुकेशभाई पटेल (संम्रोली, जि. नवसारी) यांना मिळाला.
केशर गटात प्रथम- जनकभाई पटेल (केवडा, वलसाड,), द्वितीय- मंगेश शंकर साळवी (गोळप, ता. जि. रत्नागिरी) तर तृतीय पुरस्कार मुकेशभाई मणिलाल पटेल (संम्रोली, जि. नवसारी) यांना मिळाला. हापूस गटात प्रथम- अंजली दीपक पाटील (रत्नागिरी), द्वितीय- उमंग प्रकाश साळवी (गोळप, ता. जि. रत्नागिरी) तर तृतीय पुरस्कार- उषाबेन र. पटेल (गोरगाम, ता. जि. वलसाड) यांना मिळाला. इतर जाती गटात प्रथम : शुभम भाऊसाहेब पवार- मियाझाकी जपान (पिंपळगाव, दाभाडी), द्वितीय : विनायक गोडे -चँगमाई मँगो (धामणगाव, इगतपुरी), तृतीय : गणेश आश्रोबा पालवडे- तोतापुरी (भूम, जि. धाराशिव), चतुर्थ : मैत्री नितीनभाई आहिर- राजापुरी (घडोई, वलसाड) तर पाचवा पुरस्कार यज्ञेश वसंतराव कातबने-टॉमी (धनगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण ग्रीनझोन अॅग्रोकेमचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले.
Abundant opportunities for beekeeping business
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…