सातपूर च्या शिवाजी नगर मध्ये लिफ्ट कोसळली

सातपूर: प्रतिनिधी

शहरातील नागरिक दिवाळीचा आंनद घेत असताना सातपुरच्या शिवाजी नगर मध्ये धक्का दायक घटना समोर आली आहे. सातपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ असलेल्या सनशाईन इमारतीच्या लिफ्ट मधून काही बायका लिफ्ट मधून उतरत असतानाच अचानक लिफ्ट चे नियंत्रण सुटल्याने एक महिला लिफ्टमध्ये अडकली यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून, खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेमुळे शहरातील लिफ्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  शहरातील अनेक लिफ्टची सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाकडून नीट व्यवस्थापन होत नाही. महापालिका देखील या महत्वाच्या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहत नाही.

पहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *