नाशिक

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात अकरा हजार पक्ष्यांचा किलबिलाट

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी निफाड तालुक्यातील खानगावथडी येथे 1911 मध्ये बांधलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणावरील महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणार्‍या आणि राज्यातील पहिले रामसर दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त पक्षी गणना घेण्यात आली. नांदूरमध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव अशा एकूण सात ठिकाणी केलेल्या पक्षीनिरीक्षणात अकरा हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
यामध्ये 9253 पाणथळ पक्षी, तर 1923 गवताळ भागातील पक्षी बघावयास मिळाले. यामध्ये स्थलांतरित ब्ल्यू चिक बीइटर, वॉटरकॉक, मार्श हेरीअर पक्ष्याचे दर्शन झाले. तसेच काळा तपस, पिवळा तपस आणि लाल तपस हे तीन प्रकारचे पक्षीदेखील बघावयास मिळाले. पावसाळ्यात अभयारण्यात हळदीकुंकू, वारकरी, सूर्यपक्षी, जांभळी पानकोबंडी, राखी बगळा, तांबट, राखीधनेश, मुनिया, स्टोनचाट, उघड्या चोचीचा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, स्पुनबिल, शेकाट्या, नदीसुरय आदी पक्षी आढळून आले आहेत.
अभयारण्याच्या विविध पक्षी निरीक्षण मचाणवरून पक्षीमित्रांच्या सहकार्याने पक्षीगणना करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, वनपाल रूपेशकुमार दुसाने, वनरक्षक जी. के. पाटील, के. डी. सदगीर, नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, पक्षिमित्र सतीश गोगटे, उमेशकुमार नागरे, अनंत सरोदे, वन कर्मचारी अमोल दराडे, गंगाधर आघाव, रोहित मोगल, विकास गारे, रोशन पोटे, प्रमोद मोगल, संजीव गायकवाड, सुनील जाधव, गणेश वाघ, पंकज चव्हाण, प्रमोद दराडे, एकनाथ साळवे, अमोल डोंगरे आदी सहभागी झाले होते.

हिवाळ्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन

हिवाळ्यात या परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. 310 पेक्षा अधिक जातींचे पक्षी या ठिकाणी बघावयास मिळतात तसेच 65 जातींचे मासे आणि 500 पेक्षा जास्त वनस्पतीदेखील या अभयारण्यात आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago