नाशिक

द्वारका परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा मनपाकडून कारवाई

 दुकाने, पत्र्याच्या शेड हटवल्या

नाशिक/ वडाळागाव : प्रतिनिधी
मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी द्वारका चौकातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर काल महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सकाळपासूनच द्वारका भागातील अतिक्रमणांवर बुलडोझर चालविला. त्यामुळे द्वारकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
द्वारका भागात होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून याठिकाणी असलेले सर्कल हटवून आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. याठिकाणी शनिवारी भुजबळ यांनी पाहणी करुन महापालिकेच्या अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर काल सकाळीच मनपाने या भागात असलेले अतिक्रमित दुकाने हटविली.
द्वारका परिसरात वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी हाजी अली सर्कलच्या धर्तीवर आधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. द्वारका चौक ते वडाळा नाका परिसरात रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेली दुकाने, पत्र्याच्या शेड, अनधिकृत रचनेचे अडथळे हटवण्यात आले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या अतिक्रमणांवर आळा बसणार असून, सिग्नल यंत्रणेसाठी आवश्यक जागाही मोकळी झाली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, पूर्व व सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव, तसेच नाशिक रोड व पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे आदी अधिकार्‍यांनी सहभाग घेतला. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व यंत्रणा सकाळपासून सक्रिय होती.
या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण परिसरात लक्ष ठेवत शांततेत कारवाई पार पाडली. सिग्नल यंत्रणा बसल्यानंतर द्वारका परिसरातील वाहतूक नियंत्रणात राहील, अपघातांचे प्रमाण
कमी होईल.

अशी होती यंत्रणा

सहा अतिक्रमण गाड्या, दोन जेसीबी, तीन ट्रॅक्टर, एक डंपर, महापालिकेचे सर्व पथक, तसेच पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

88 आस्थापनांवर बडगा

द्वारका ते मुंबई नाका परिसरातील मुख्य रस्त्याला व सर्व्हिस रोडवरील अडथळा निर्माण ठरणार्‍या 88 अतिक्रमित आस्थापनांवर पोलिस विभाग व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. सहा विभागांच्या सर्व कर्मचा़र्‍यांंनी दोन जेसीबी, चार ट्रकद्वारे अतिक्रमण मोहीम राबवली. ही मोहीम सकाळी दहापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत राबवली.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago