अनोखा उपक्रम : 150 हून अधिक महिला-पुरुषांना नियमित रोजगार
नाशिक : प्रतिनिधी
बहीणभावाच्या अतूट बंधनाचा सण राखी पौर्णिमा अवघ्या आठवड्याभरावर आला आहे. मेळघाटातील आदिवासी महिला आदिवासी कारागिरांनी बांबूपासून हाताने तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांनी यंदा देशाच्या सीमा ओलांडल्या असून, अमेरिका, जर्मनी, आयर्लंड आणि जपान या देशांसह मुंबई, पुणे, कानपूर, दिल्ली व बंगळुरू येथेही या राख्यांची विक्री होत आहे. या उपक्रमामुळे धारणी तालुक्यातील 150 जणांना नियमित रोजगार मिळत असून, त्यात 70 महिलांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, ज्या कारागीर महिला किंवा पुरुषाने बांबूपासून राखी तयार केली, त्याचेच नाव त्या राखीला देण्यात आले असून, असा अनोखा उपक्रम राबविल्याने कारागिरांच्या कलेला नाव मिळाले आहे.
सृष्टीबंध अंतर्गत मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्र, लवादा, पोडुनी (ता. धारणी, जि. अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली वेणुशिल्पी औद्योगिक सहकारी संस्था, लवादा येथे या राख्यांचे उत्पादन व विक्री केली जाते. आदिवासी विभागाच्या शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाचे या संपूर्ण कार्याला सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. लवादा, चित्री, घोटा आणि कोठा या धारणी तालुक्यातील चार गावांतील महिला या उपक्रमात प्रामुख्याने सहभागी आहेत.
एका कुशल कारागिराला एक राखी तयार करण्यासाठी सुमारे 15 ते 20 मिनिटे लागतात. यंदा अमेरिका, जर्मनी, आयर्लंड आणि जपान येथे राख्या पाठविण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई, पुणे, कानपूर, दिल्ली आणि बंगळुरू येथे राख्या व राखी मेकिंग किटची विक्री करण्यात आली आहे. पुणे व नागपूर येथील अनेक शाळांनी राखी मेकिंग किट खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव दिला आहे.
नाशिक येथील शबरीच्या कार्यालयात या राख्या उपलब्ध असून, मराठा प्रसारक महाविद्यालयाचे विद्यार्थी राखी मेकिंग किट तसेच बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तूंचा प्रसार करीत आहेत. राख्यांसाठी व्हॉट्सअॅपवर निरुपमा देशपांडे – 9545717614, सतीश घाणेकर – 9422386660, मारोती शनवारे – 9764641878 आणि गणेश कानसे – 9822862205 यांच्याशी संपर्क साधता येईल.
संस्थेतर्फे सूर्या राखी – 50 रुपये, राधा राणी राखी (26032) – 50 रुपये, मोर राखी (26033) – 50 रुपये, संजना राखी (26034) – 40 रुपये, रामलीला राखी (26019) – 40 रुपये, नयना राखी (26020) – 40 रुपये, अदिती राखी (26021) – 40 रुपये आणि चांदणी राखी (26022) – 40 रुपये अशा विविध प्रकारच्या बांबूच्या राख्या तयार करण्यात येतात.
बांबूपासून राख्या तयार करण्याचे कौशल्य आम्हाला रोजगाराचे साधन मिळवून देत आहे. घरातील कामे सांभाळून या उपक्रमात सहभागी होता येते आणि त्यातून मिळणारे उत्पन्न कुटुंबाला हातभार लावते. आमच्या हाताने तयार केलेल्या राख्या देशभरासह परदेशातही जात आहेत, याचा आम्हाला विशेष अभिमान आणि आनंद आहे. – आदिवासी महिला कारागीर, मेळघाट
पर्यावरणपूरक बांबूपासून राख्या बनविल्या जातात. या राख्यांना परदेशातही मागणी वाढली आहे. यानिमित्ताने आदिवासींच्या कलेला परदेशी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. आदिवासी महिलांना रोजगार मिळत आहे, याचा आनंद सर्वांत जास्त आहे. – निरुपमा देशपांडे
Demand for Melghat bamboo Rakhis from across the seas.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik