नाशिक

नाशिकरोडच्या उड्डाणपुलावर शत्रूची टेहळणी करणारी बोट अडकली

वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
गुजरात ते मुंबई समुद्रपट्टीवर शत्रूची टेहळणी करणारी बोट नाशिकरोडच्या उड्डाणपुलावर अडकली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका चौकातील अंडरपासचे काम सुरू झाल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
द्वारका चौक पुढील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याने नाशिकरोडकडून शहराकडे येणारी सर्व अवजड वाहतूक बिटको चौक मार्गे जेलरोड आणि फेम चौकाकडे वळवण्यात आली आहे. मंगळवारी रात्री नौदलाच्या बोटी घेऊन जाणारा ट्रेलर बिटको चौकातून जात असताना, बोटीच्या उंचीमुळे तो उड्डाणपुलाच्या खालच्या भागात फसला. आधीच अरुंद रस्ते आणि त्यात हा अडथळा निर्माण झाल्याने काही वेळातच वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला. ट्रेलर अडकल्याने रेल्वे स्टेशन आणि सिन्नर फाट्याकडून येणार्‍या वाहनांच्या रांगा थेट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. दुसरीकडे दत्तमंदिर, मुक्तिधाम आणि कन्या शाळेपर्यंत वाहने अडकून पडली होती. रात्रीच्या वेळी ही कोंडी झाल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सामाजिक कार्यकर्त्यांची धाव

बोटीचा ट्रेलर सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तांत्रिक कसरत करावी लागली. यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतीचा हात दिला. काही तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर हा ट्रेलर मार्गस्थ झाला आणि वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली विकासकामे आणि रस्ते खोदाईमुळे नाशिककर त्रस्त आहेत. द्वारकासारखा महत्त्वाचा चौक बंद केल्याने आता नाशिकरोडच्या अंतर्गत रस्त्यांवरही अवजड वाहनांचा भार वाढला असून, प्रशासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

Enemy patrol boat gets stuck on Nashik Road flyover

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago