नाशिक

सिन्नर तहसीलचे कामकाज दुसर्‍या दिवशीही संपामुळे ठप्प

65 तलाठ्यांसह अनेक कर्मचार्‍यांचा सहभाग; महसुलावर परिणाम

सिन्नर : प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे यांसह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसर्‍या दिवशी सिन्नर येथील महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला. त्यामुळे तहसील कार्यालयातील बहुतांश कामकाज ठप्प झाले.विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागत आहे.
या संपात 65 तलाठी, 12 मंडळ अधिकारी, 8 लिपिक, 9 अव्वल कारकून, पाच शिपाई आणि एक वाहनचालक सहभागी झाले आहेत. त्यामुळे महसूल विभागाची नियमित कामे ठप्प झाली आहेत. मात्र, निवडणुकीसंदर्भातील कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नायब तहसीलदार सागर मुंदडा, महसूल नायब तहसीलदार माणिक गाडे, निवडणूक नायब तहसीलदार संजय गाडे, तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक जमधडे हे अधिकारी कामावर उपस्थित होते. त्यांनी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. मात्र, कर्मचारी संपावर असल्याने अनेक कामे होऊ शकली नाहीत.
सिन्नर-1 आणि सिन्नर-2 ही दोन्ही सबरजिस्ट्रार कार्यालये दुसर्‍या दिवशीही बंद असल्याने दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले. परिणामी शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात तूट झाल्याची माहिती मिळाली आहे.

Sinnar Tehsil’s work remains disrupted for the second day due to strike

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago