महाराष्ट्र

समर्पित आयोगास निवेदन देण्यासाठी मदत कक्षाची स्थापना

नागरिक व संघटनांनी 21 मेपर्यंत करावी नाव नोंदणी
नाशिक : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागास प्रवर्गाच्या ओबीसी, व्हीजेएनटी आरक्षणाबाबत गठीत केलेल्या समर्पित आयोगास निवेदने देणाऱ्या नागरिक व सामाजिक संघटनांची नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेत मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या मदत कक्षात 21 मे  पर्यंत नाव नोंदणी करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी  कळविले आहे.
नाशिक विभागात समर्पित आयोगामार्फत २२ मे  सायंकाळी ०५.३० ते ०७.३० पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिक व विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी निवेदने देणाऱ्या नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षात 21 मे  सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी, व्हिजेएनटी आरक्षणाबाबत जनतेची मते जाणून घेण्याकरीता समर्पित आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. हा आयोग नाशिक विभागात २२ मे  नमूद वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयात भेट देणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकरी गंगाथरन डी. यांनी दिली.
Devyani Sonar

Recent Posts

श्रमिकनगरला टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्या

नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…

10 hours ago

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…

1 day ago

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

3 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

3 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

4 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

4 days ago