नाशिक

भोवताली दाटला अंधार तरी…

अंधांच्या जीवनात केटीएचएमचा शिक्षणरूपी प्रकाश

नाशिक ः प्रतिनिधी
जन्मतः अंध किंवा काही कारणास्तव दृष्टी गेलेल्या मुला-मुलींना शिक्षण घेण्यास अडचणी येतात; परंतु जीवनातील अंधार दूर करून शिक्षणाद्वारे प्रकाश निर्माण करता येऊ शकतो, हे अनेकउदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. आज अनेक क्षेत्रांत यशस्वीपणे नोकरी-व्यवसाय करत स्वावलंबी बनले आहे.
शहरातील केटीएचएम महाविद्यालय हे अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दीपस्तंभ ठरले आहे. दरवर्षी 40 ते 50 दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना केवळ दहा रुपयांत प्रवेश देण्यात येतो. मागील वर्षी महाविद्यालयाच्या सर्व शाखांमध्ये 150 अंध विद्यार्थी दाखल झाले होते.चेन्नईस्थित हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन आणि केटीएचएम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 2024 पासून ई-मेट (इम्पॉलॉयबिलिटी, मोबॅलिटी अ‍ॅन्ड इंग्लिश ट्रेनिंग) हा विशेष प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अंध विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, इंग्रजी संभाषण व इतर जीवनोपयोगी कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते.संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविणारे हे महाविद्यालय ठरले आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक अंध विद्यार्थ्याला दहा हजार शिष्यवृत्ती स्मार्ट व्हिजन ग्लासेस, संगणक साधनांचे मोफत वितरण करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात गेल्या वर्षी अत्याधुनिक 25 संगणक असलेले स्वतंत्र रिसोर्स सेंटर उभारण्यात आले आहे. यात केवळ अंध विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण दिले जाते.या उपक्रमात प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, समन्वयक डॉ. तुषार पाटील, तसेच सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे आणि सर्व पदाधिकारी मार्गदर्शक भूमिका बजावत आहेत.

असे घेतात शिक्षण

दृकश्राव्य माध्यमाबरोबर अंधांसाठी खास तयार केलेले सॉफ्टवेअर जेएडब्लूएस वापरले जाते. दिसत नसल्याने ऑडिओ क्लिप्स आणि या जेएडब्लूएस सॉफ्टवेअरला व्हॉइस कमांड दिली जाते. जे लेटर दाबले त्याचे उच्चारण ऐकू येते. त्यातून विद्यार्थी माहिती घेतात. शिकतात.

यंदा दीडशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, या मुलांना दहा रुपयांत पदवीचे शिक्षण दिले जाते. उत्तीर्ण झाल्यानंतर जवळपास 50 ते 60 विद्यार्थी बॅँका आणि इतर चांगल्या ठिकाणी नोकरीस लागले आहेत. अंध मुलांना रस्ता सापडण्यासाठी (नॅव्हिगेशन) डिव्हाइस दिले आहे. त्यातून ते अभ्यास आणि इतर कामेही करू शकतात.
– अ‍ॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस,मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक

दिव्यांग विद्यार्थी असूनही कधीच शिक्षणामध्ये अडचण आली नाही. शिष्यवृत्ती, तसेच लॅपटॉप अशा अनेक सुविधा प्राप्त झाल्या. मी दुर्ग संवर्धक म्हणून आजवर अनेक रेकॉर्ड केले आहेत. मला चांगल्या पदावर नोकरीदेखील मिळाली. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा. यश नक्कीच प्राप्त होईल.
– सागर बोडके, दिव्यांग माजी विद्यार्थी, सध्या बँक ऑफ इंडिया अंबड शाखेत कार्यरत

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

33 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

36 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

50 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

54 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

58 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago