नाशिक

महावितरण विरोधात महापालिका गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत

फांद्या छाटल्याप्रकरणी 25 लाखांची नोटीस

नाशिक : प्रतिनिधी
महावितरण कंपनीने काही दिवसांपूर्वी महात्मानगर परिसरात महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी न घेताच झाडांच्या फांंद्या छाटल्या होत्या. याप्रकरणी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. विनापरवानगी थेट फांद्या छाटल्याने उद्यान विभागाने महावितरणला पंचवीस लाखांचा दंड ठोठावत चांगलाच दणका दिला होता. महावितरणवरील या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले. दरम्यान, पंचवीस लाखांचा दंड न भरल्यास महावितरणविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनी शहरातील विविध भागांत झाडांची छाटणी करते. याठिकाणी झाडे उंच वाढलेली असतील किंवा रस्त्यात फांद्या आल्या असतील, तेथे वीजतारांचा स्पर्श होऊन दुर्घटना घडू नये म्हणून महावितरणतर्फे दरवर्षी फांद्या छाटल्या जातात; परंतु या फांद्या छाटण्यासाठी महावितरणला महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. महात्मागनर येथे गेल्या आठवड्यात पन्नास झाडांच्या फांद्या विनापरवानगी छाटण्यात आल्या होत्या. याची गंभीर दखल मनपाच्या उद्यान विभागाने घेत याप्रकरणी पंचवीस लाखांंचा दंड ठोठावला. झाडांची छाटणी केल्याने पालापाचोळा रस्त्यात पडला. हा पालापाचोळा इतरत्र पडल्याने अनेक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. त्या परिसरात दुर्गंधी पसरली. शिवाय हा पालापाचोळा उडून ड्रेनेजमध्येही गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी ड्रेनजलाइन तुंबल्या. त्याचाही फटका रहिवाशांना सोसावा लागला. त्याबाबत अनेक तक्रारी महापालिकेच्या घनकचरा, उद्यान विभागाकडे आल्या होत्या. याबाबतची दखल उद्यान विभागाने घेत महावितरणला दंडाची नोटीस धाडत दणका दिला.

विनापरवानगी झाडांच्या फांद्या छाटल्याप्रकरणी महावितरणला पंचवीस लाखांची दंडाची नोटीस दिली आहे. ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यास याप्रकरणी महावितरणविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
– विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, मनपा

 

Editorial Team

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

6 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

27 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

34 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

40 minutes ago