सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांनी केला तब्बल इतक्या रकमेचा अपहार

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांनी केला तब्बल इतक्या रकमेचा अपहार

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

नाशिक: सातपूर येथील आयटीआय मध्ये प्राचार्य असताना तब्बल 19,50,682/- रुपये (एकोणीस लाख पन्नास हजार सहाशे ब्यांएशी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सुभाष मारुती कदम यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सन 2017-18 मध्ये सुभाष कदम हे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते.प्रभारी प्राचार्य असताना जेम्स पोर्टलवरुन खरेदी प्रक्रिया मध्ये अनियमितता दाखवून व तंत्र प्रदर्शन स्पर्धा नियमाप्रमाणे न भरविता मोठ्या प्रमाणात शासन निधीचा गैर वापर करून तसेच खोटे बिले सादर करून शासन रक्कम 19,50,682/ रुपयांचा अपहार करून शासनाचे नुकसान केल्याचे  चौकशीत निष्पन्न झाले म्हणुन  सुभाष मारुती कदम, यांचेविरुध्द सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे दिनांक १२/०६/२०२४ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम १३(१) (अ) व भादवी कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार-* श्रीमती. वैशाली माधव पाटील, पोलीस उपअधीक्षक, ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी तक्रार दिली. तपास अधिकारी उपअधीक्षक अनिल बडगुजर हे अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदशनखाली करत आहेत,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *