नाशिक: प्रतिनिधी
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी ला आज सकाळी सुरुवात झाली. महायुती चे उमेदवार नरेंद्र दराडे आणि प्रचार थांबूनही विजयाचा दावा करणाऱ्या अपक्ष गोकुळ गीते यांच्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 310 ही मॅजिक फिगर पहिल्या पसंतीत ज्या उमेदवाराला मिळेल, तो विजयी घोषित करण्यात येणार आहे. मतमोजणी ला सुरवात होताच अपक्ष गोकुळ गीते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले .मतमोजणी वर आक्षेप घेतल्याने मतमोजणी थांबवण्यात आली होती. गोकुळ गीते यांनी तीन वकील बाजू मांडण्यासाठी आणले होते. दराडे समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला त्यामुळे काही काळ तनावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोण निवडून येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
गीतेंनी घेतला आक्षेप
मतमोजणी केंद्रात विद्यमान आमदार उपस्थित असल्यामुळे गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतला आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत गीते यांच्या आक्षेपाचं निरसन करण्यात आलं आहे. दरम्यान दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दीक बाचाबाची व शिवीगाळ झाली आहे
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik