गणेशोत्सवानिमित्त सिटी लिंकतर्फे जादा बस

नाशिक :प्रतिनिधी
गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळामुळे गणेश भक्तांवर काही मर्यादा आलेल्या होत्या. परंतु यावर्षी कोरोनामुक्त गणेशोत्सव साजरा केला जात असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गणेश मंडळांकडून साकारण्यात आलेले विविध देखावे त्याचप्रमाणे गणेश दर्शनासाठी भाविकांची मोठी मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून खास गणेश भक्तांसाठी सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दिनांक ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर दरम्यान या जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे ३ ते ८ सप्टेंबर कालावधीत सायंकाळी १८.०० वाजेपासून पहाटे २ वाजेपर्यंत या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यामध्ये नवीन सी बी एस ( सिव्हील हॉस्पिटल ) ते सिम्बोईसिस, नवीन सीबीएस ( सिव्हील हॉस्पिटल )ते बारदान फाटा व नाशिकरोड ते नवीन सी बी एस  (सिव्हील हॉस्पिटल) या मार्गावर प्रत्येकी ४ बसेस सोडण्यात येणार आहे. तर नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल) ते अंबड, नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल)ते पाथर्डी गाव, नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल) ते आडगाव व नाशिकरोड ते निमाणी मार्गे जेलरोड या मार्गावर प्रत्येकी 2 अशा एकूण 20 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..
Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago