नाशिक

पांढुर्ली, साकूर फाट्यावर एटीएम लुटीचा अयशस्वी प्रयत्न

गॅस कटरने कापले एटीएम मशिन, मोहीम अर्धवट सोडून चोरट्यांचे पलायन

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर – घोटी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली आणि इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा अशा दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने कापून लुटीचा अयशस्वी प्रयत्न केला. स्थानिक सजग नागरिकांमुळे दोन्हीही ठिकाणी मोहीम अर्धवट सोडून त्यांना पळ काढावा लागला. त्यामुळे दोन्ही एटीएममध्ये असलेली लाखो रुपयांची रोकड सहीसलामत राहिली.

साकूर फाट्यावर गुरुवारी (दि.19) रात्री एक ते सव्वा वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी एसबीआयच्या एटीएम मध्ये प्रवेश करून प्रारंभी सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरने रोकड असलेले एटीएम मशीन कापण्यास सुरुवात केली. काही भाग कापून झाल्यानंतर आवाजाने स्थानिक जागे झाले. त्यांनी जोराची आरोळी ठोकल्यानंतर चोरट्यांनी तेथून सिन्नरच्या दिशेने पोबारा केला. त्यानंतर पांढुर्ली चौफुलीवर असलेल्या याच बँकेच्या एटीएम मध्ये प्रवेश करत तेथेही गॅस कटरच्या साह्याने रोकड असलेल्या एटीएम मशीनचा सुमारे दोन ते अडीच फूट पत्रा कापला. यादरम्यान शेजारील एक रहिवासी लघुशंकेसाठी उठला असता एटीएम मध्ये काहीतरी गडबड सुरू असल्याचे लक्षात येताच त्याने सिन्नर पोलिसांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली. त्यानंतर चोरट्यांनी लागलीच बाहेर येत ईर्टीगा कार मध्ये बसून सिन्नरच्या दिशेने धूम ठोकली. दरम्यान, शुक्रवारी (दि.20) ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. हे ठसाचे नमुने फोरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
पांढुर्ली येथील एटीएम लुटीचा अयशस्वी प्रयत्न केल्याबद्दल एसबीआयचे चॅनेल एक्झिक्यूटिव्ह संकेत चंद्रशेखर वैद्य (40) रा. इंदिरानगर नाशिक, यांनी सिन्नर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणारवाडीवरून मधल्या मार्गाने कार गायब

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक संजय गोसावी यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या इर्टिगा कारमधून चोरटे पसार झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, नंबर प्लेट पुसट असल्याने क्रमांक पोलिसांच्या लक्षात आला नाही. सिन्नरच्या दिशेने आलेली ही इर्टिगा कार लोणारवाडीपर्यंतच दिसली. तेथून ती मधल्या मार्गाने गेल्याचा संशय आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago