सांगवी शिवारातील संशयित शेतकरी जेरबंद
देवळा : प्रतिनिधी
तालुक्यातील सांगवी, उमराणे शिवारात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुद्देमालासह संशयिताला ताब्यात घेण्यात आले. या प्रकाराने तालुक्यातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांना मिळालेल्या खबरीनुसार तालुक्यातील सांगवी (उमराणे) शिवारातील राजेंद्र विठ्ठल देवरे याने आपल्या स्वतःच्या शेतात मानवी मेंदूवर विपरीत करणार्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली असून, त्यांची व्यावसायिक उपयोगा करता तो देखभाल करीत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार देवळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते वा पोलिस पथकाने संशयित राजेंद्र विठ्ठल देवरे यांच्या शेतात छापा टाकून लागवड केलेली सहा फूट उंचीचे सहा गांजाची झाडे पंचासमक्ष जप्त केली. संबंधित ठिकाणी एक लाख 11 हजार 220 रुपये किंमतीची एकूण 11 किलो 122 ग्रॅम वजनाचा हिरवा ओला गांजा मिळून आला. संशयित राजेंद्र देवरे (रा. उमराणे शिवार) यास ताब्यात घेतले. कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, पोलिस उपनिरीक्षक दामोदर काळे, पोलिस हवालदार सुभाष चव्हाण, राहुल सिरसाठ, नितीन बारहाते, श्रावण शिंदे,अरिफ शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…