नाशिक

जेलरोडच्या आम्रपाली झोपडपट्टीत घरात घुसून कुटुंबावर हल्ला

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जेलरोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टीत जुन्या वादातून एका कुटुंबावर घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. संशयितांनी घरात घुसून तरुणाला बेदम मारहाण केली तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांवर धारदार शस्त्र व फायटरने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पूनम विजय सौदे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा यश सौदे (19) याच्यासोबत परिसरातील एका महिलेशी संबंधित वादातून ही घटना घडली. शनिवारी रात्री आठच्या सुमारास पूनम सौदे या घरात स्वयंपाक करत असताना आणि यश घरात असताना संशयित आकाश कांगुणे, गणेश कांगुणे, पवन अहिरे व मया कांगुणे यांनी घरात प्रवेश केला.
यावेळी ‘माझ्या भावजयीला मेसेज का करतोस’ असे म्हणत आकाश कांगुणे याने यशला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या पूनम सौदे यांना धमकावण्यात आले. संशयितांनी घरातील साहित्याची तोडफोड करून यशला घराबाहेर ओढत नेले.
घराबाहेर संशयित अंबादास कांगुणे याने लाकडी दांडके दिल्यानंतर यशला दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या पूनम सौदे यांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नातेवाइकांवरही हल्ला करण्यात आला. देवीदास विधाने यांच्यावर लोखंडी धारदार शस्त्राने वार करण्यात आले, तर फायटरने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. तसेच किरण व कोमल गोगलीया यांनाही दांडके व दगडांनी मारहाण करण्यात आली.
या घटनेत यश सौदे व देवीदास विधाने हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी आकाश कांगुणे, गणेश कांगुणे, पवन अहिरे, मया कांगुणे आणि अंबादास कांगुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Family attacked after intruders break into home in Jail Road’s Amrapali slum.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

15 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago