मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत
असतांना शॉक लागून मृत्यू
मनमाड : प्रतिनिधी
मनमाडनजीक असलेल्या नागापूर पवार वस्तीवर रेल्वे कर्मचारी असलेल्या तरुण शेतकऱ्यांचा कांद्याची ट्रॉली भरत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे कांद्याची ट्रॉली भरत असताना डोक्यावर असलेली विजेची तार असल्याचे लक्षात न आल्याने तार डोक्याला लागून त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते. ज्ञानेश्वर रामभाऊ पवार असे या तरुणाचे नाव आहे.
मनमाड इंजिनिअरिंग कारखान्यात वेल्डिंग विभागात कर्मचारी असलेले ज्ञानेश्वर रामभाऊ पवार हे नाईट ड्युटी असल्याने त्यांच्या शेतीवर कांद्याची ट्रॉली भरण्यासाठी मदत करत होते . कांंद भरत असताना असतानाच त्यांच्या डोक्यावर असलेली वायरचा अंदाज न आल्याने त्याचे डोके वायरला लागले यात शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला शॉक लागल्यानंतर त्याला तात्काळ मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले यावेळी डॉक्टरानी तपासणी करून मृत घोषित केले या घटनेने मनमाड व नागापूर या ठिकाणी शोककळा पसरली.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…