पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन

पळसेत बिबट्याचे

भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन

नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे येथे काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास समाधान महादू गायधनी यांच्या द्राक्ष बागेतील गल्लीतील बांधावर तर काही शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याचा मुक्तसंचार करीत असून,   बिबट्या आता दिवसाही फिरताना दिसत असल्याने शेतकरी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.वनविभागाने तातडीने योग्य ती उपाययोजना करुन सतत बिबट्या दिसणाऱ्या ठिकाणी पिंजरे लावून शेतकरी व गावातील नागरिकांना बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करण्याची मागणी पळसेकरांनी केली आहे.नाशिकरोड शहरापासून अगदीच हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे गावातून जाणाऱ्या जुना नासाका रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात सोमवारी दुपारी १ वाजता संजय व समाधान गायधनी यांच्या द्राक्षबागेतील गल्लीत बिबट्या मोठ्या ऐटीत फिरताना अचानक शेतीत जात असताना नजरेस पडला आणि एकच धावपळ झाली असली तरी बिबट्या मात्र आपल्या ऐटीतच उभा राहिल्याने संबधीत शेतकरी लगेचच डोळ्याची पापणी लवण्याच्या आत मागे फिरला. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडली होती. पळसे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात शेती असल्याने तसेच बाजूला दारणा नदी असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी कधी सर्व्हिस रोड लगतच्या झाडाझुडपात तर कधी थेट रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होते. बिबट्यांना लपण्यासाठी जागा आणि पिण्यासाठी मुबलक पाणी असल्याने बिबट्याची संख्येत या भागात वाढ झाल्याचे चित्र पहावयास सध्या मिळत आहे.

यावेळी घरातील माणसाचे सकाळचे जेवण आटोपल्यानंतर घरातील गृहीणी सोनाली गायधनी व शारदा गायधनी हया भांडे धूवून खरखटे पाणी फेकण्यास बाहेर आल्या असता अचानक समोरच बिबटयाचे दर्शन होताच घरातील समाधान गायधनी यांना आवाज दिला तर आरडा-ओरडा होत असताना देखील बिबट्या जैसे थे स्थितीत द्राक्षाच्या बांधावरच बसून राहिला समाधान ची नजर बिबट्यावर गेल्याने त्याने तात्काळ मोबाइलच्या सहाय्याने बिबट्याचे शूटिंग केले.  वनविभागाने तातडीने ठोस पाऊले उचलून नागरिकांना भयमुक्त करावे.तसेच वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी सरपंच ताराबाई गायधनी, माजी सरपंच अजित गायधनी,माजी सरपंच नवनाथ गायधनी,उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी,शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख दीपक गायधनी,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष गणेश गायधनी,मनसे उपतालुकाध्यक्ष ईश्वर गायखे, समाधान गायधनी,किरण नरवडे, प्रकाश गायधनी, प्रमोद गायधनी,संजय गायधनी,राजेंद्र गायधनी, विलास आगळे, जयंत गायधनी, दिलीप गायधनी, संदिप गायधनी, मधुकर पगार,बाबुराव चौधरी, सुभाष ढेरींगे, विजय पाटील आदीसह शेतकरी वर्गाने केली आहे.

 

Bhagwat Udavant

Recent Posts

पावसाळ्यात केसांची निगा

पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…

14 hours ago

आषाढी एकादशी उपवासाचे पूर्ण ताट

वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्‍याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…

14 hours ago

किचन ते कॉन्फरन्स रूम

भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…

14 hours ago

कृषी शिक्षण प्रवेशप्रक्रिया व संधी

शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…

16 hours ago

धोकादायक यशवंत मंडईवर हातोडा

मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…

16 hours ago

कांदा आयात बंदीवर केंद्रानेे हस्तक्षेप करावा

सभापती जगताप : बांगलादेशकडून अधिकृत घोषणाच नाही लासलगाव : वार्ताहर गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारकडून…

16 hours ago