कारवाई न झाल्यास जऊळके दिंडोरीतील शेतकरी आंदोलनाचे हत्यार उपसणार
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी येथील करीना एंटरप्राइजेस या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत असून, या शेतकर्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
जऊळके दिंडोरी येथील गट नंबर एकमध्ये करीना एंटरप्राइजेस ही कॅरेट बनवण्याची कंपनी असून, या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या गट नंबर दोनचे मालक विठाबाई संपत शिरसाठ, सिंधुबाई रंगनाथ शिरसाठ, यशवंत रंगनाथ शिरसाठ, गट नंबर तीनचे मालक जयश्री शिवाजी बोरस्ते, कीर्ती भूषण बोरस्ते, सुमन शंकर शिरसाठ, गट नंबर चारचे मालक दत्तात्रय सुखदेव जोंधळे या सर्व शेतकर्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई केली नाही, तर शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला
बसणार असल्याचा इशारा
दिला आहे.
आता या शेतकर्यांना न्याय मिळणार की नाही हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागूल, पोलीसपाटील श्रीधर दामू गांगुर्डे, शांताराम भास्कर जोंधळे, कैलास रंगनाथ शिरसाठ, यशवंत रंगनाथ शिरसाठ, सोमनाथ पिलाजी बोरस्ते, सोमनाथ दत्तात्रय जोंधळे, संतोष दशरथ जोंधळे, तानाजी खंडेराव जोंधळे, राघोजी भांगरे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ रामलाल वतार, पंकज सुरेश गांगुर्डे, शंकर खंडू गोतरणे, हिरामण कारभारी जोंधळे, भाऊसाहेब गंगाधर जोंधळे, अशोक महादू जोंधळे, चंद्रभान रंगनाथ शिरसाठ, सचिन चंद्रभान शिरसाठ, विजय यशवंत शिरसाठ, मनोज खंडेराव शिरसाठ, रोहित कैलास शिरसाठ, वेदांत बाळू चव्हाण आदी शेतकरी व गावकरी उपस्थित होते.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…