अखेर म्हेळूस्के येथे एक बिबट्या जेरबंद
म्हेळुस्के : वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथे गेल्या अनेक दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे.
म्हेळूस्के गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याने दहशत माजवली होती जनावरे, कुत्रे, वासरे यांच्यासह अनेक पाळीव प्राण्यांवर देखील हल्ले करून ठार केले दिवसा व रात्री देखील बिबट्यांचे नेहमी सर्वांना दर्शन होत आहे. त्यामुळे शेतातील कामे करण्यास देखील मजूर येत नाहीत. व आताही अनिल मेधने यांच्या वस्तीवर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार केले होते.त्या मुळे वनविभागाने तीन दिवसांपूर्वी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता,विशेष म्हणजे पिंजरा लावल्यापासून सलग दोन दिवस बिबट्या पिंजऱ्यात येत होता,परंतु पिंजऱ्याची खालची प्लेट बिबट्या उचकवत असल्याने जेरबंद होत नव्हता.स्थानिक शेतकऱ्यांनी पिंजऱ्याची किरकोळ दुरुस्ती केली असता आज सलग तिसऱ्या दिवशी बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…