कांद्याच्या माळा घालुन मतदानाला निघालेल्या शेतकऱ्यांना अडवले
नाशिक: प्रतिनिधी
कांद्याची निर्यात बंदी नंतर निर्यात खुली केल्यानंतरही लावलेल्या40 टक्के निर्यात शुल्का मुळे दिंडोरी मतदार संघात मोठा रोष दिसून येत आहे, त्याचा प्रत्यय आज मतदानाच्या दिवशीही आला. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत मतदानाला निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवले. कांद्याच्या माळा काढून मग मतदान करा, असे पोलिसांनी त्यांना बजावले. दिंडोरी मतदार संघात कांदा प्रश्न निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत देखील एका शेतकऱ्याने कांद्यावर बोला अशी घोषणा बाजी केली होती, महायुती च्या उमेदवार भारती पवार आणि महाविकास आघाडी चे भास्कर भगरे यांच्या प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.