आस्वाद

फास्टफूड घातक

आहारातील घटकांवर आरोग्य अवलंबून असते. रोजचा आहार चौरस असावा म्हणजे त्यात शरीराला आवश्यक असणार्‍या सर्व पदार्थांचा समावेश असावा, असे आहारशास्त्र सांगते. पण धावपळीच्या सध्याच्या काळात लोकांना स्वयंपाकासाठी आणि जेवणासाठी वेळ नाही, मग आधार घेतला जातो तो फास्टफूडचा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण फास्टफूड आवडीने खातात. विशेषतः शाळकरी मुलांना तर फास्टफूड म्हणजे पर्वणीच वाटते. घरी तयार केलेली भाजी-पोळी खाताना किरकिर करणारी मुले फास्टफूड मात्र मिटक्या मारत खातात. त्यामुळेच झटपट तयार होणारे आणि जिभेला हवेहवेसे वाटणारे हे पदार्थ सध्या भरपूर खपतात. जिभेला हवेहवेसे वाटणारे हे पदार्थ प्रकृतीला मात्र चांगले नसतात. झटपट तयार होणार्‍या या फास्टफूडमध्ये साखर आणि मीठ यांचे प्रमाण खूप असते. शिवाय ते भरपूर तळलेलेदेखील असतात. अति प्रक्रिया केलेल्या या पदार्थांत कोणतेही पौष्टिक घटक नसतात. त्यामुळे या पदार्थांपासून दूर राहावे, असा सल्ला डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ देत असतात, तरी लोक त्यांचे ऐकत नाही. दोन वर्षांपूर्वी एका फास्टफूड बनवणार्‍या जगप्रसिद्ध कंपनीने हे मान्य केले होते की, ही कंपनी तयार करीत असलेल्या 60 टक्के पदार्थात आणि शीतपेयांमध्ये शरीराला पौष्टिक असे काही नाही. या कंपनीचे नुडल्स आणि कॉफी हे दोन पदार्थ जगप्रसिद्ध आहेत. शिवाय चॉकलेट, केक, पास्ता, केचप, वेफर्स, कुरकुरे यांसारखे विविध पदार्थ ही कंपनी बनवते. फास्टफूडमुळे मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. अतिप्रमाणात फास्टफूड खाण्यात आल्यास हृदयरोग, मधुमेह आणि स्थूलतेचा धोका आहे. अतिप्रमाणात फास्टफूड खाणार्‍यांना कर्करोगासारखा असाध्य आजारही होऊ शकतो, असे जाणकार सांगतात.

Fast food is dangerous

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

15 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago