7 बस, 3 कार एकमेकांवर धडकल्या

नवी दिल्ली :
दाट धुक्यांमुळे मुथरेत यमुना एक्स्प्रेस-वेवर थरकाप उडवणारी घटना घडली आहे. सात बस आणि तीन कार अशी दहा वाहने एकमेकांना धडकली. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना एक्सप्रेस-वेवर हा अपघात झाला. या अपघातात आगीमुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले, या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले.
मंगळवारी भल्या पहाटे प्रवासी साखरझोपेत असताना ही घटना घडली. ही घटना आग्रा ते नोएडा मार्गावर बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेहरा गावाजवळ घडली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. मदतकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पोहोचवले. मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सात बस आणि तीन लहान कार एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे अनेक प्रवासी वाहनांमध्येच अडकले. काही प्रवाशांनी खाली उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, आत अडकलेल्या प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली. या बसेस आग्राकडून नोएडाच्या दिशेने येत होत्या. पहाटेच्या दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडली. सुरुवातीला एका कारची दुसर्‍या कारला धडक बसली आणि त्यानंतर ही धडक मालिका सुरू झाली. एकापाठोपाठ एक गाड्या आदळत गेल्या. टक्कर झाल्यानंतर काही क्षणातच या वाहनांनी पेट
घेतला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा जिल्ह्यातील रस्ते अपघाताची दखल घेतली आहे. अधिकार्‍यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

new delhi

Fatal accident due to dense fog
 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago